पवार-ठाकरेंचं टेन्शन वाढलं!, तगड्या उमेदवाराचा वंचितमध्ये प्रवेश, ‘या’ मतदारसंघातून लढणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Utkarsha Rupwate | उमेदवारी न मिळाल्याने महायुती तसंच महाविकास आघाडीमधील अनेक नेते मंडळी रुसून बसले आहे. याचा प्रत्यय बऱ्याच मतदारसंघात दिसून आला आहे. लोकसभेचं तिकीट न मिळाल्याने थेट पक्षच बदलल्याचं चित्रही राज्यात दिसून येत आहे. आता शिर्डी मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. या ठिकाणी मविआला मोठा धक्का बसला आहे.

मविआकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आता अकोला येथे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत उत्कर्षा रुपवते यांनी प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते वंचितमध्ये

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये तीन-तीन पक्षांची आघाडी असल्याने सर्वांनीच जागा वाटपचा फॉर्म्युला ठरवलाय. ज्या भागात ज्या पक्षाला जागा मिळेल तिथे त्याचाच उमेदवार जाहीर करण्यात आला. अशात कॉँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होत्या. मात्र, मविआच्या जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली.

त्यामुळे ठाकरे गटकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. येथे भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे यांची लढत होणार हे निश्चित असताना आता उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) वंचितकडून गेल्याने शिर्डीत तिरंगी लढत होऊ शकते.

शिर्डीमध्ये तिरंगी लढतीची शक्यता

उत्कर्षा रुपवते यांनी मागील महिन्यातच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या वंचित पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. उत्कर्षा रूपवते या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षश्रेष्ठींकडे ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी करत होत्या. ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रूपवते या आक्रमक झाल्या होत्या.

त्यांनी पक्षश्रेष्ठींनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी देखील होती. देशभर न्याय यात्रा काढणारे राहुल गांधी पक्षातीलच युवकांना न्याय देणार का, असा सवालच त्यांनी केला होता. तेव्हापासून रूपवते यांच्या बंडखोरीच्या चर्चा होत्या. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी (Utkarsha Rupwate) वंचितमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिर्डी येथे आता तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याचा मविआला निवडणुकीत मोठा फटका बसणार आहे.

News Title: Congress leader Utkarsha Rupwate joins VBA

महत्त्वाच्या बातम्या-

100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; या यादीत ‘इतक्या’ भारतीयांना मिळाले स्थान

आज पंजाबचे शिलेदार मुंबई इंडियन्सला रोखणार का?

या राशीच्या व्यक्तींने आज प्रवास करणे टाळावा

पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसेची फिल्डिंग; बैठकीत काय काय घडलं, जाणून घ्या संपूर्ण माहिती

राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींबद्दल अमित ठाकरेंनी केला सर्वात मोठा खुलासा!