एसटी महामंडळाच्या गाड्या करणार शिंदे सेनेचा प्रचार, एवढ्या गाड्या केल्या बुक!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lok Sabha Elections 2024 | लोकसभेसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जवळपास सर्वच जागा जाहीर झाल्या आहेत. काहींनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केले आहेत. आता सगळीकडे प्रचार सभा, जोरदार भाषणे यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच शिंदे गटाच्या प्रचाराच्या स्टाइलने सध्या सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.

शिंदे गटाने थेट राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या प्रचारासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या तब्बल 1 हजार बसेस लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचा प्रचार करणार आहेत.शिंदे गट बसवर जोरदार जाहिरातबाजी करणार आहे.

एसटीवर शिंदे गटाच्या जाहिराती झळकणार

यासाठी त्यांनी हक्क प्राप्त केले आहेत. शिंदेसेनेच्या (Lok Sabha Elections 2024) व्यतिरिक्त इतर कुणाच्याही जाहिराती परवानाधारक अथवा इतरांमार्फत प्रसारित होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असं परिपत्रक राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना महामंडळाच्या नियोजन व पणन महाव्यवस्थापकांनी पाठवलं आहे.

याबाबत शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. प्रचारासाठी आपण ज्या पद्धतीने भाडेकराराने खासगी वाहने लावतो, तशाच भाडेकराराने एसटी बसवर या जाहिराती झळकतील. त्यासाठी जे काही चार्जेस असतील, ते दिले जातील, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

शिंदे गटाचा जोरदार प्रचार

त्यामुळे राज्यभर (Lok Sabha Elections 2024) आता शिंदे सेनेचा जोरदार प्रचार होईल. एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे गावोगावी शिंदे सेना मतदारांच्या नजरेत येईल. याचा निवडणुकीत त्यांना मोठा फायदा होईल. शिंदे गटाची प्रचाराची ही शक्कल आता राजकारणात चर्चेत आली आहे.

राज्यात महायुतीचं सरकार असून त्यात शिंदे गट हा महत्वाचा पक्ष आहे. शिंदे गटानेही आपल्या लोकसभेच्या बऱ्याच जागा जाहीर केल्या आहेत.एकनाथ शिंदे हे महायुतीचे स्टार प्रचारक आहेत. आता तर भाजपाला मनसेनेही बिनशर्त पाठिंबा दिल्याने महायुती जोरदार शक्तीप्रदर्शन करेल.

News Title: Lok Sabha Elections 2024 Shinde group advertisements on ST buses

महत्त्वाच्या बातम्या-

सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींकडून अत्यंत खळबळजनक खुलासा

“भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा…”, शिंदे गटाच्या नेत्याच्या आरोपांनी खळबळ

100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; या यादीत ‘इतक्या’ भारतीयांना मिळाले स्थान

आज पंजाबचे शिलेदार मुंबई इंडियन्सला रोखणार का?

या राशीच्या व्यक्तींने आज प्रवास करणे टाळावा