“देशभरात इंडिया आघाडीच्या बाजूने छुपी लाट, भाजप फक्त 150 जागा जिंकेल”

Rahul Gandhi | लोकसभा निवडणुकांमुळे देशभरासह राज्यातही प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. भाजपाने यंदा 400 पारचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे ‘इंडिया’ आघाडीदेखील जोरदार प्रचार करत आहे. कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशात ‘भारत जोडो यात्रा’ आणि ‘भारत न्याय यात्रा’ करत जनसंपर्क वाढवला आहे. त्यामुळे यंदा निवडणुकीत त्यांची बाजूही भक्कम आहे.

अशात राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधत मोठा दावा केला आहे. सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासमवेत पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोठा खुलासा केला. या निवडणुकीत सर्वसामान्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. निवडणुकीत बेरोजगारी, महागाई यासारखे मोठे मुद्दे आहेत; परंतु भाजप त्यांच्यापासून जनतेचं लक्ष हटवण्यात गुंतलेला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

भाजप फक्त 150 जागांवर मर्यादित राहणार

इतकंच नाही तर, यावेळी त्यांनी निवडणूक रोखेबाबतही मोठं भाष्य केलं. राजकारणात पारदर्शकता यावी म्हणून निवडणूक रोखे आणल्याचा दावा केला जात असताना सर्वोच्च न्यायालयाने त्यावर आक्षेप घेत ते बंद का केलं?, असा सवाल गांधी यांनी केला आहे. तसंच देशात काँग्रेस-सपा आघाडी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवेल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी देशात भाजप 180 जागा जिंकेल असं वाटत होतं. पण आता ते फक्त 150 जागापर्यंतच मजल मारतील, असं चित्र आहे. आम्हाला प्रत्येक राज्यातून अहवाल मिळत आहेत की, आमची स्थिती मजबूत होत आहे आणि ‘इंडिया’च्या बाजूने एक छुपी लाट आहे, असा दावा यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला.

अमेठीबाबत मोठा खुलासा

यावेळी राहुल गांधी यांनी अमेठीबाबत मोठा खुलासा केला. अमेठीबाबत पक्ष निर्णय घेईल. मला जो काही आदेश मिळेल, तो मी पाळेन. आमच्या पक्षात हे निर्णय सीईसी (केंद्रीय निवडणूक समिती) बैठकीत घेतले जातात, अशी माहिती त्यांनी दिली.

या निवडणुकीत दोन विचारांची लढाई आहे. एकीकडे राज्यघटनेसाठी लढणारी इंडिया आघाडी आहे, तर दुसरीकडे राज्यघटना आणि लोकशाही संपुष्टात आणू पाहणारी भाजप अशी ही लढाई असल्याचं राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले आहेत.

News Title: Rahul Gandhi claims BJP will win only 150 seats

महत्त्वाच्या बातम्या-

सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींकडून अत्यंत खळबळजनक खुलासा

“भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा…”, शिंदे गटाच्या नेत्याच्या आरोपांनी खळबळ

100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; या यादीत ‘इतक्या’ भारतीयांना मिळाले स्थान

आज पंजाबचे शिलेदार मुंबई इंडियन्सला रोखणार का?

या राशीच्या व्यक्तींने आज प्रवास करणे टाळावा