मिधेंना माझं जाहीर आव्हान, माझ्यासोबत… आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

Aditya Thackeray | लोकसभा निवडणुका आता काहीच दिवसांवर आल्या आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष होणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाडीमधील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येतात. लोकसभेसाठी दोन्ही आघाडीने जवळपास सर्वच जागा जाहीर केल्या आहेत. आता तर भाजपाला मनसेचाही पाठिंबा मिळाला आहे.

पाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे महायुतीची बाजू अजूनच भक्कम असल्याचं दिसून येतं. या दरम्यानच उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे.

आदित्य ठाकरेंची पोस्ट चर्चेत

बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्ल्युएन्सर आणि पाॅडकास्टना त्यांचे कार्यक्रम होस्ट करण्यासाठी सांगत असल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे. त्यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

‘बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्ल्युएन्सर आणि पाॅडकास्टना होस्ट करण्यास सांगत आहे. मात्र, मी मिंधेंना चॅलेंज देत आहे. त्यांनीच माझ्यासोबत पाॅडकास्ट करावा आणि वन टू वन चर्चा करावी.’, असं आव्हानच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलंय. यावेळी त्यांनी उद्योग गुजरातला गेल्याचं म्हणत सरकारवर टीकाही केली.

एकनाथ शिंदे यांना आव्हान

महाराष्ट्रातून जे उद्योग गुजरातला नेण्यात आले त्या संदर्भामध्ये चर्चा करूया. महाराष्ट्रामधील युवकांना रोजगाराची संधी असताना त्यांच्या पाठीमध्ये वार का करण्यात आला याबद्दल चर्चा करूया. शेतकरी आत्महत्या का करत आहेत? शहरी गुन्हेगारीत का वाढ होत आहे. आपल्या राज्यात महिलांना कठीण प्रसंगाला तोंड का द्यावं लागत आहे?, असा सवाल ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदेंना केलाय.

महाराष्ट्र भरडला जात असताना, लुटला जात असताना हे निर्लज्जपणे आपल्या पदाचा वापर कंत्राटदार मित्रांसाठी करत आहेत. असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सीएमओ महाराष्ट्राला टॅग केलं आहे. आता आदित्य ठाकरे यांचं आव्हान एकनाथ शिंदे स्वीकारणार काय?, ते पाहावं लागेल.

News Title : Aditya Thackeray on Eknath Shinde

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर ठरलं… शिंदे गटाचं एक पाऊल मागे, नारायण राणेंची उमेदवारी जाहीर

सलमान खान गोळीबार प्रकरणाला नवं वळण!

पुढील 5 ते 7 दिवस… हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील ‘या’ भागांना पावसाचा इशारा

घरी आलेल्या मैत्रिणीला दिलं गुंगीचं औषध आणि त्यानंतर मैत्रिणीच्या भावानेच…

अवघी 4 गुंठे जमीन आणि रहायला झोपडी!, शेतकऱ्याच्या मुलानं UPSC परीक्षेत मारली बाजी