घरी आलेल्या मैत्रिणीला दिलं गुंगीचं औषध आणि त्यानंतर मैत्रिणीच्या भावानेच…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Patna Crime News | बिहारमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर आरोपीने तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. बिहार राज्यातल्या पटणामध्ये ही घटना घडली आहे.

या प्रकरणी पीडितेच्याच वर्गात शिकणाऱ्या मैत्रिणीच्या भावाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेची आईने ही तक्रार केली आहे. याची दखल घेत आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने आरोप केलाय की, मुलीचा आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ तिच्या दीराच्या मोबाइलवर कोणी तरी पाठवले होते. यानंतर ही घटना समोर आली.

12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

हे फोटो आणि व्हिडीओ बघून मुलीच्या घरच्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी मुलीला याबाबत सर्व हकीकत विचारली. तेव्हा अल्पवयीन मुलीने सर्व घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली. मुलीने जे काही सांगितलं ते ऐकून घरच्यांच्या (Patna Crime News ) पायाखालची जमीनच सरकली.

एके दिवशी शाळेतल्या तिच्या वर्गमैत्रिणीने तिला वही नेण्याच्या निमित्ताने तिच्या घरी नेलं होतं. त्यावेळी तिच्या मैत्रिणीने तिला पाण्यातून गुंगीचं औषध दिलं. ते प्यायल्यावर ती बेशुद्ध पडली. ती शुद्धीवर आल्यानंतर मैत्रिणीच्या भावाने तिला सांगितलं, की तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवण्यात आले आहेत.

मैत्रिणीचा भाऊ करायचा ब्लॅकमेल

मैत्रिणीच्या भावाने या मुलीला धमकी देखील दिली. या घटनेबाबत कुणाला काही सांगितलं तर तुझे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केले जातील, अशी धमकी त्या मुलाने पीडित मुलीला दिली. यामुळे ही अल्पवयीन मुलगी घाबरून गेली आणि तिने याचा खुलासा कधी केलाच नाही.

आरोपी सतत तिला ब्लॅकमेल करत असे. तसंच तिला कधी हॉटेलमध्ये, तर कधी घरी बोलावून तिच्याशी दुष्कृत्य करू लागला. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी कारवाई करून आरोपी तरुणाला पकडलं आहे. त्याच्यावर पुढील कारवाई देखील होणार आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

News Title-  Patna Crime News 

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपची धाकधूक वाढली; ‘हे’ दोन मतदारसंघ जिंकणं कठीण

सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींकडून अत्यंत खळबळजनक खुलासा

“भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा…”, शिंदे गटाच्या नेत्याच्या आरोपांनी खळबळ

100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; या यादीत ‘इतक्या’ भारतीयांना मिळाले स्थान

आज पंजाबचे शिलेदार मुंबई इंडियन्सला रोखणार का?