पुढील 5 ते 7 दिवस… हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील ‘या’ भागांना पावसाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather | राज्यात गेल्या काही दिवसांत मुळसधार पाऊस पडून गेला. यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळला होता. तर, या आठवड्यात पुन्हा एकदा तापमानात वाढ झाल्याचं दिसून आलं. या दोन दिवसांत तर उष्णता अधिकच जाणवली. आता हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली आहे.

बंगालच्या उपसागरावरून छत्तीसगड तेलंगणामार्गे विदर्भातही आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत असल्याने शुक्रवारी व शनिवारी राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असतानाच काही ठिकाणी पाऊस पडला.

मराठवाड्यात बीडमध्ये जोरदार पाऊस झाला. येथे वीज कोसळून चार जनावरे दगावली.तर, हिंगोली जिल्ह्यातही पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथेही काल (17 एप्रिल)सायंकाळी गारपीट झाली. सातारा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. तर सांगली जिल्ह्याला गारपिटीने झोडपलं.

‘या’ भागाला पावसाचा इशारा

आता हवामान विभागाने आज 18 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, बीडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तर नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला (Maharashtra Weather) आहे. यासोबतच विदर्भामध्ये शुक्रवार आणि शनिवार म्हणजेच 19 व 20 एप्रिलरोजी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज दिला आहे.

‘या’ भागात सर्वाधिक तापमान

राज्यात मालेगावमध्ये सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं आहे. येथे तापमान 43 अंशावर पोहोचलंय. तर जळगाव येथे 42 अंश, परभणी येथे 41 अंश आणि सातारा, नाशिक, बारामती आणि छत्रपती सांभाजीनर येते तापमान 40 अंशाच्या जवळपास आहे.

वातावरणातील खालच्या स्तरातील द्रोणिका रेषा सध्या दक्षिण (Maharashtra Weather) विदर्भापासून दक्षिण कोकणापर्यंत गेली असल्याने कोकणात तसेच मुंबईत कमाल तापमा

नात वाढ झाली आहे. तसंच येथे आर्द्रतायुक्त उष्ण वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

News Title : Maharashtra Weather  

महत्त्वाच्या बातम्या-

सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींकडून अत्यंत खळबळजनक खुलासा

“भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा…”, शिंदे गटाच्या नेत्याच्या आरोपांनी खळबळ

100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; या यादीत ‘इतक्या’ भारतीयांना मिळाले स्थान

आज पंजाबचे शिलेदार मुंबई इंडियन्सला रोखणार का?

या राशीच्या व्यक्तींने आज प्रवास करणे टाळावा