सलमान खान गोळीबार प्रकरणाला नवं वळण!

Salman Khan Viral Video

Salman Khan Firing | 14 एप्रिलला सलमान खानच्या (Salman Khan Firing) गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर घटनास्थळी मुंबई पोलीस तैनात झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घडलेल्या घटनेनंतर सलमान खानची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आम्ही लॉरेन्स बिश्नोईला खतम करू असं वक्तव्य केलं.

दरम्यान, सलमान खान गोळीबार प्रकरणी (Salman Khan Firing) अनेक अपडेट समोर येत आहेत. एकाला हरियाणातून अटक करण्यात आली आहे. तो लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा होता. त्याने बिश्नोईसोबत काम देखील केलं असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी (Salman Khan Firing) आणखी एकाला 17 एप्रिलला रात्री अटक करण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नुकताच अटक करण्यात आलेला आरोपी बिश्नोई गँगकडून काम करत आहे. या व्यक्तीला हरियाणातून बेड्या ठोकल्यात.

काय होतं प्रकरण?

बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी 14 एप्रिलला गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झाला. त्यामुळे वांद्रे परिसरात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. ज्यादिवशी गोळीबार झाला होता तेव्हा सर्व सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. त्यानंतर तपास करत आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर आणखी एकाला ताब्यात घेतलं आहे.

आरोपींना गोळीबार करण्याची दिली सुपारी

दोन आरोपींना गोळीबार करण्यासाठी दोन काडतुसे गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते. म्हणजेच 12 गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी त्यांना गोळीबाराआधी 1 लाख रूपये आणि काम झाल्यानंतर पूर्ण 3 लाख रूपये रक्कम देण्यात येणार होती, अशी माहिती तपासातून समोर आलीये.

News Title – Salman Khan Firing Case In Another Suspect Arrested From Haryana

महत्त्वाच्या बातम्या

एसटी महामंडळाच्या गाड्या करणार शिंदे सेनेचा प्रचार, एवढ्या गाड्या केल्या बुक!

पवार-ठाकरेंचं टेन्शन वाढलं!, तगड्या उमेदवाराचा वंचितमध्ये प्रवेश, ‘या’ मतदारसंघातून लढणार?

टी 20 विश्वचषकातील टीम इंडियाचे संभाव्य शिलेदार जाहीर; या खेळाडूंना मिळणार संधी

भाजपची धाकधूक वाढली; ‘हे’ दोन मतदारसंघ जिंकणं कठीण

सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींकडून अत्यंत खळबळजनक खुलासा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .