रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिंदे गटानं का घेतली माघार?, उदय सामंत यांनी सांगितलं खरं कारण

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha | गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) तिढा होता. आता तो तिढा सुटला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) शिंदे गटाने माघार घेतली आहे. महायुतीकडून नारायण राणे निवडणूक लढवणार असले तरीही आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असं मत्री उदय सामंत म्हणाले आहेत.

नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

अनेक दिवसांपासून शिंदे गट रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघावर निवडणूक लढवण्यासाठी दावा करत होता. मात्र आता वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र आतापर्यंत दावा करणाऱ्या शिंदे गटाने माघार का घेतली?, त्याबाबत आता उदय सामंत यांनी सांगितलं. (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha)

“मी देखील 4 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. धनुष्यबाणासाठी किरण सामंत यांच्या नावासाठी आग्रह केला. आकडेवारी सादर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोललो. त्यानंतर काल रात्री पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली”, असं उदय सामंत म्हणालेत.

माघार घेण्याचं कारण काय?

“तिकीट वाटपाची चर्चा असताना उमेदवार जाहीर न झाल्याने कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत असतील. यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडचण होईल. तो त्रास होऊ नये यासाठी आम्ही शिवसैनिक म्हणून त्यांच्या मागे प्रामाणिकपणे उभे राहू. नारायण राणे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आहेत. आम्ही काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला असला तरी, उद्या फॉर्म भरताना नारायण राणेंसह उपस्थित असू”, असं उदय सामंत म्हणालेत.

एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचा शब्द फूकट जाऊ नये तसेच महायुतीमध्ये तेढ निर्माण होऊ नये. यासाठी आम्ही हा निर्णय मोठ्या मनाने स्विकारला असल्याचं उदय सामंत म्हणालेत.

 News Title – Ratnagiri Sindhudurg Lok Sabha In Shivsena Shinde Uday Samant Accept Narayan Rane Candidacy

महत्त्वाच्या बातम्या

घरी आलेल्या मैत्रिणीला दिलं गुंगीचं औषध आणि त्यानंतर मैत्रिणीच्या भावानेच…

अवघी 4 गुंठे जमीन आणि रहायला झोपडी!, शेतकऱ्याच्या मुलानं UPSC परीक्षेत मारली बाजी

सुजय विखे 5 वर्षे फिरकलेच नाहीत!, भाजपच्या 100 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याने अहमदनगरमध्ये खळबळ

PF खात्यातून पैसे काढणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

“देशभरात इंडिया आघाडीच्या बाजूने छुपी लाट, भाजप फक्त 150 जागा जिंकेल”

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .