सुजय विखे 5 वर्षे फिरकलेच नाहीत!, भाजपच्या 100 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याने अहमदनगरमध्ये खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

BJP | अहमदनगरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. येथे पक्षाच्या तब्बल 100 कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे नाराजी कळवत राजीनामे दिले आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामागे नगर दक्षिणचे खासदार सुजय विखेंना पुन्हा दिलेली उमेदवारी दिल्याचं कारण सांगितलं जात आहे.

सुजय विखे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याचं सुनील रासने यांनी म्हटलं आहे. त्यांनी उमेदवारीच्या निषेधार्थ मी माझ्या पक्षाने दिलेल्या पदाचा राजीनामा देत आहे. पक्षाचा प्राथमिक सदस्य म्हणून सक्रिय राहणार व निष्ठावंत म्हणून भविष्यात पक्ष शुद्धिकरणासाठी काम करत राहणार असल्याचं म्हटलं आहे.

या पत्रात विखे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. विकासकामे सोडून सुजय विखे हे इतर कामावरच अधिक भर देत असल्याचं म्हणत उमेदवार बदलण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. एकाचवेळी 100 जणांनी राजीनामा देत ही नाराजी जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पदाधिकाऱ्यांच्या पत्रात नेमकं काय?

राजकारणात सध्या सुनील रासने यांचं पत्र चर्चेत आलं आहे. त्यांनी पत्रात म्हटलं की गेल्या 45 वर्षापासून पक्ष (BJP) रचनेत मी आणि माझा परिवार काम करत आलो आहोत. माझे पिताश्री आणि मातोश्रींचा 1972 च्या आणीबाणीच्या काळात आंदोलनात सक्रिय सहभाग होता तसेच अयोध्या येथील कार सेवेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. या सर्व बाबींचा आम्हास गर्व आहे.

मी भारतीय जनता पार्टीच्या रचनेत शेवगाव शहर सरचिटनीस, शहर उपाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस असे अनेक पदावरती सेवा दिली आहे. अटल बिहारी वाजपेयी, स्व. गोपिनाथ मुंडे साहेब, स्व. दिलीप गांधी साहेब, स्व. राजीवजी राजळे साहेब यांच्या प्रेरणेने काम करत आलो आहोत. परंतु येत्या 2024 लोकसभा निवडणुकीकरता विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना अहिल्यानगर लोकसभा मतदार संघ 37 उमे‌दवारी दिल्याने भारतीय जनता पार्टीची नगर दक्षिण जाग ही धोक्यात येवू शकते.

सुजय विखे 5 वर्षे मतदारसंघात फिरकलेच नाहीत

खासदार निवडून गेल्यानंतर त्यांचा मतदार संघाशी संपर्क मोठया प्रमाणात तुटला आहे. नागरिकांचे, कार्यकत्यांचे फोन न उचलणे, समोरच्या व्यक्तीचे म्हणने ऐकून न घेता त्याला सुमार दर्जाचा सल्ला देणे, पार्टी म्हणजे मी, मी म्हणजे मतदार संघातील जनता असे म्हणून जनतेला, मतदाराला गृहित धरणे सिर्फ मुझे गिनो. या स्वभावामुळेच मागे जिल्ह्यात पाट आमदारांना घरी बसवण्याचे पुण्य पार्टीच्या पदरात टाकण्याचं काम यांनी केले आहेत. तसेच मतदार संघात पायाभूत सेवेचा फज्जा उडलेला आहे. शेवगाव शहर व ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, रस्ते, वैद्यकिय संस्था असतानाही जिल्हयाच्या बऱ्याच तालुक्यात मलेरिया, डेंग्यू आदी रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतात.

महसुल विभागातील लोकांच्या जीवनावश्यक समस्या ही पैसे दिल्याशिवाय सुटण्यास तयार नाही. 5 वर्ष मतदार संघात संपर्क न ठेवणारे आमचे खासदार साहेब ऐन निवडणुकीच्या (BJP) तोंडावर साखर, दाळ वाटप करणे. नागरिकांना शिर्डी दर्शन, लहान-मोठे सांस्कृतीक कार्यक्रम असे केविलवाणे प्रकार करताना दिसत आहे. आत्ता निवडणुकीच्या तोंडावर साखर, दाळ वाटप करण्या ऐवजी किमान गुळासारखे गोड बोलणे जरी ठेवले असते तरी जनता सोबत राहिली असती परंतु आज निवडणुकीच्या अगोदरच त्यांच्या पराभवाची चिन्हे दिसत आहेत, असा दावाच या पत्रात केला आहे.

News Title : 100 BJP workers resigned and accused Sujay Vikhe

महत्त्वाच्या बातम्या-

100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; या यादीत ‘इतक्या’ भारतीयांना मिळाले स्थान

आज पंजाबचे शिलेदार मुंबई इंडियन्सला रोखणार का?

या राशीच्या व्यक्तींने आज प्रवास करणे टाळावा

पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसेची फिल्डिंग; बैठकीत काय काय घडलं, जाणून घ्या संपूर्ण माहिती

राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींबद्दल अमित ठाकरेंनी केला सर्वात मोठा खुलासा!