“ही लढाई नाचीशी नाहीये, डान्सरशी नाहीये तर…”, नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांचा तोल सुटला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी आपल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रचार करत आहेत. प्रत्येक मतदारसंघात जात सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षांवर टीका करत आहेत. अशातच आता अमरावती येथे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमरावतीत सभेला संबोधित करत असताना नवनीत राणा यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.

संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमी आपल्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात. त्यांनी केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं आहे. आता अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली. ही लढाई नाचीशी नाही, डान्सरशी नाही, बबलीशी नसल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी नवनीत राणा यांना उद्देशून केलं. यामुळे आता संजय राऊत (Sanjay Raut) अडचणीत सापडले आहेत.

“ही लढाई नाचीशी नाही, डान्सरशी नाही…”

अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना संधी दिली आहे. “बळवंत वानखेडे यांची लढाई नाचीशी नाही, डान्सरशी नाही, बबलीशी नाही तर ही लढाई मोदी विरूद्ध महाराष्ट्राशी आहे”, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.

ज्या बाईने मातोश्रीत घुसण्याचा…

बळवंत वानखेडे यांच्या सभेसाठी संजय राऊत भाषण करत असताना नवनीत राणांवर टीका करताना त्यांचा तोल सुटला. “बळवंत वानखेडे विरोधात नाची, डान्सर, बबलीशी नाही तर ही लढाई मोदी विरूद्ध महाराष्ट्राशी आहे. ही लढाई मोदी विरूद्ध शरद पवार यांच्याशी आहे, तर ही लढाई मोदी विरूद्ध राहुल गांधींशी आहे,” असं म्हणत संजय राऊत यांनी हल्ला केला.

“ज्या बाईने मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला. मातोश्री आणि हिंदूत्वाबद्दल अपशब्द वापरलेत. त्या बाईचा पराभव करण शिवसैनिकांचं पहिलं आणि नैतिक कर्तव्य आहे,” असंही संजय राऊत म्हणालेत.

गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी देखील राणा दांम्पत्यांची क्लास घेतली. प्रहार संघटनेचे कार्यकर्ते नवनीत राणा यांच्यावर नाखूश असल्याने बच्चू कडू यांनी आपली वेगळी चूल मांडली आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी नवनीत राणांवर बोलत असताना खालच्या पातळीची टीका केली. याविरोधात नवनीत राणा संजय राऊत यांना काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं गरजेचं आहे.

News Title – Sanjay Raut On Navneet Rana At Amravati Lok Sabha

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंची मनोज जरांगेंवर पहिल्यांदाच टीका, थेट म्हणाल्या..

‘दोन-चार महिन्यात शिंदे..’, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मिधेंना माझं जाहीर आव्हान, माझ्यासोबत… आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

16 वर्षाच्या भाच्यावर आला आत्याचा जीव, प्रकरण कोर्टात जाताच आला आत्याला हादरवून टाकणारा निकाल

अखेर ठरलं… शिंदे गटाचं एक पाऊल मागे, नारायण राणेंची उमेदवारी जाहीर