अजित पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत सुनेत्रा पवार, संपत्तीचा आकडा आला समोर

Sunetra Pawar Property l लोकसभा निवडणुकांचे वारे सर्वत्र फिरत आहेत. सर्वच राजकीय पक्ष प्रचारामध्ये मग्न असल्याचं दिसत आहे. अशातच महाराष्ट्रात सर्वात चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. अशातच या मतदार संघासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

सुनेत्रा पवारांची एकूण संपत्ती किती? :

यावेळी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीविषयी मोठी माहिती दिली आहे. मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती ही अजित पवारांच्या संपत्तीहून जास्त असल्याचं दिसून येत आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याकडे एकूण स्थूल मूल्य हे 12 कोटी 56 लाख 58 हजार 983 रुपये इतकं असल्याचं समोर आलं आहे. तसेच त्यांच्याकडे रोख रक्कम ही 3 लाख 36 हजार 450 रुपये इतकी आहे. तर त्यांच्या बँकेतमध्ये असलेल्या ठेवीची एकूण रक्कम ही 2 कोटी 97 लाख 76 हजार 180 रुपये इतकी असल्याचं समोर आलं आहे. मात्र अजित पवार यांची बँकेतील ठेवी ही 2 कोटी 27 लाख 64 हजार 457 इतकी आहे.

याशिवाय सुनेत्रा पवार यांनी वेगवेगळ्या शेअर्समध्ये 15 लाख 79 हजार 610 इतकी रक्कम देखील गुंतवली आहे. तसेच बचत योजनांमध्ये तब्बल 56 लाख 76 हजार 877 रुपये गुंतवले आहेत. याशिवाय 6 कोटी 05 लाख 18 हजार 116 रुपयांचं व्याजाचे मूल्य देखील आहे.

Sunetra Pawar Property l एकूण स्थावर मालमत्ता किती आहे? :

सुनेत्रा पवार यांच्याकडे तब्बल 34 लाख 39 हजार 569 रुपये इतक्या रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिणे देखील आहेत. तसेच सुनेत्रा पवारांच्या ताफ्यामध्ये तब्बल 10 लाख 70 हजारांच्या किमतीच्या गाड्या देखील आहेत. त्यामध्ये एक ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलर असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांकडे तब्बल 58 कोटी 39 लाख 40 हजार 751 रुपयांची एकूण स्थावर मालमत्ता असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. त्यामध्ये शेतजमीन आणि इतर प्रकारच्या जमीनीचा देखील समावेश आहे. मात्र अजित पवार यांच्या नावे 37 कोटी 15 लाख 70 हजार 029 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

याशिवाय सुनेत्रा पवारांच्या नावे 12 कोटी 56 लाख 58 हजार 983 रुपयांची जंगम मालमत्ता देखील आहे. तर अजित पवारांच्या नावे ती 13 कोटी 25 लाख 06 हजार 033 रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सुनेत्रा पवार यांच्यावर तब्बल 12 कोटी 11 लाख 12 हजार 374 रुपयांचं कर्ज देखील आहे. तर अजित पवार यांच्या नावे 4 कोटी 74 लाख 31 हजार 239 रुपयांचं कर्ज आहे.

News Title: Sunetra Pawar Property

महत्त्वाच्या बातम्या-

या राशीच्या व्यक्तीने नवीन कामात सावधानता बाळगावी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मोठा झटका, तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता जप्त

तीन दिवसांत घडलेल्या तीन घटनांनी पुणे हादरलं!

“हे राम, मामींना ऑस्कर देऊन टाका”, अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ट्रोल

“ही लढाई नाचीशी नाहीये, डान्सरशी नाहीये तर…”, नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांचा तोल सुटला