सुनेत्रा पवारांनी कुणाकुणाला दिली मोठ्या रकमेची कर्ज?, नावं ऐकून धक्का बसेल…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sunetra Pawar l महाराष्ट्रात बारामतीच्या जागेवर जोरदार लढत होणार आहे, त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल सुप्रिया सुळे यांनी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडील संपत्तीचा आकडा नमूद केला आहे. त्यामधून त्यांच्याकडील संपत्तीचा आकडा समोर आला आहे.

Supriya Sule Property l सुप्रिया सुळेंची संपत्ती किती? :

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार सुप्रिया सुळे यांची एकूण संपत्ती 38 कोटी रुपये आहे. तसेच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सुनेत्रा पवार यांचे 35 लाख रुपये देखील थकीत आहेत. तसेच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे स्वत:ची कार देखील नसल्याचं समोर आलं आहे. सुप्रिया सुळे यांच्यावर एकूण 55 लाखांचे कर्ज आहे. त्यांची संपत्ती 142 कोटी रुपये आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे 42 हजार 500 रुपये रोख रक्कम आहे.

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे 11 कोटी 83 लाख 29 हजार 195 रुपये बँकेत जमा आहेत. त्यांच्याकडे 7 लाख 13 हजार 500 रुपयांची राष्ट्रीय बचत योजना आहे. याशिवाय सुप्रिया सुळे यांच्याकडे 1 कोटी 1 लाख 16 हजार 18 रुपयांचे सोने आहे. 4 लाख 53 हजार 446 रुपयांची चांदीही आहे. तसेच 1 कोटी 56 लाख 06 हजार 321 रुपये किमतीचा हिरा देखील आहे. बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडेही शेतजमीन असून त्यांचे बाजारमूल्य 9 कोटी 15 लाख 31 हजार 248 रुपये आहे.

Supriya Sule Property l बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी होणार लढत :

तीन वेळा लोकसभा सदस्य राहिलेल्या सुप्रिया सुळे आणि त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी (१८ एप्रिल) महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अनुक्रमे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तिकिटावर उमेदवारी दाखल केली आहे.

बारामतीच्या विद्यमान खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विश्वजित कदम यांच्यासह इतर नेते उमेदवारी अर्ज भरताना होते. सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

News Title: Sunetra Pawar Property

महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत सुनेत्रा पवार, संपत्तीचा आकडा आला समोर

या राशीच्या व्यक्तीने नवीन कामात सावधानता बाळगावी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मोठा झटका, तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता जप्त

तीन दिवसांत घडलेल्या तीन घटनांनी पुणे हादरलं!

“हे राम, मामींना ऑस्कर देऊन टाका”, अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ट्रोल