महाराष्ट्राच्या ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट जारी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update |अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचे सावट सरल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा तापमानात वाढ होत आहे. पाऊस पडल्यामुळे काही अंशी उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. अवकाळी पावसाने शेतीचं बरंच नुकसान झालं. पाऊस पडून गेल्यानंतर काही भागात तापमान पुन्हा वाढलं. तर, आता हवामान विभागाने राज्यात परत एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिलाय.

गेल्या दोन तीन दिवसांत अवकाळी पावसानं विश्रांती घेतली होती. परंतु आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अजूनच वाढली आहे. राज्यात कधी पाऊस तर कधी उकाडा असं वातावरण दिसून येतंय.काही ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस झाल्याने उकाडा अजूनच वाढला आहे.

‘या’ भागाला अवकाळीचा इशारा

राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात वादळी वारे देखील वाहतील. वाऱ्याचा वेग प्रति तास 30 ते 40 कीमी असू शकतो अशी शक्यता आहे.

राज्यात पावसाची शक्यता असली तरी काही भागांत आजही (19 एप्रिल) उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा (Weather Update) इशारा आहे. आज कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार आहे. या काळात कोकणातील तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिल.

महाराष्ट्रातील अनेक भागात उष्णता वाढली

मुंबईतही पारा 39 वर पोहोचलाय. उष्णतेमुळं मुंबईकर हैराण झाले आहेत. या दोन दिवसांत मुंबईकरांनी घराबाहेर पडताना अधिकची काळजी घ्यावी. येथे उष्णता अधिक तीव्र जाणवणार आहे. दुसरीकडे पुण्यातही उन्हाच्या झळा वाहत आहेत. येथे तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांत 40 च्या घरात कायम आहे.

पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही तापमानात वाढ होत आहे. कोल्हापूरचा पारा 40 अंशांवर तर नाशिकमध्ये देखील तापमानात एका अंशाची वाढ होऊन तापमान 39 अंशांवर पोहोचलंय. आजही (Weather Update) तापमानाची हिच स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

News Title : Weather Update unseasonal rain Warning in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या –

होता रोहित म्हणून नाहीतर… हार्दिकच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स हारता हारता वाचली!

माझ्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून यायला नको!, वंचितच्या उमेदवाराने घेतली माघार

आज लखनौ विरुद्ध चेन्नई संघ भिडणार; कोण बाजी मारणार

बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोटो गायब, भाजपच्या सभेत शिवसैनिकांनी घातला राडा

सुनेत्रा पवारांनी कुणाकुणाला दिली मोठ्या रकमेची कर्ज?, नावं ऐकून धक्का बसेल…