होता रोहित म्हणून नाहीतर… हार्दिकच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स हारता हारता वाचली!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PBKS vs MI l आयपीएल 2024 च्या 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज या रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला आहे. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 192 धावा केल्या होत्या. मात्र या सामन्यात सूर्यकुमार यादवने जादू दाखवली आहे. सूर्याच्या दमदार अर्धशतकामुळे मुंबईला मोठी धावसंख्या गाठता आली. मात्र यावेळी लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब संघाची सुरुवात अतिशय वाईट झाली आहे. कारण जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी यांनी घातक गोलंदाजी करून पंजाबला बाद केले.

आशुतोष शर्माने केली तुफान कामगिरी :

शिखर धवनच्या अनुपस्थितीत संघाची खेळी खराब झाली होती. पर्पल कॅप असलेल्या जसप्रीत बुमराहने सामन्यात 3 बळी घेत पंजाबच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आहे. पंजाबकडून आशुतोष शर्माने सर्वाधिक धावा केल्या आहेत. आशुतोषने 28 चेंडूत 61 धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

शेवटच्या 6 षटकात पंजाब किंग्जला विजयासाठी 65 धावा हव्या होत्या, पण फक्त 3 विकेट्स हातात होत्या. मात्र आशुतोष शर्मा तुफान फलंदाजी करत होता. जेव्हा आकाश मधवाल डावातील 16 वे षटक टाकायला आला तेव्हा त्याने या षटकात 24 धावा दिल्या आहेत. इथून सामना एकतर्फी दिसू लागला कारण आता पंजाबला 24 चेंडूत फक्त 28 धावांची गरज होती. या 18व्या षटकात आशुतोषची विकेट पडल्यानंतर सामना काही वेळ रखडला होता.

PBKS vs MI l मुंबई इंडियन्सची भेदक गोलंदाजी :

मात्र शेवटच्या 2 षटकात पंजाबला 23 धावांची गरज होती. 20 चेंडूत 21 धावा करून हरप्रीत ब्रार बाद झाला तेव्हा पंजाबच्या विजयाच्या जवळपास सर्व आशा संपल्या होत्या. रबाडा धावबाद होताच पंजाबचा संघ 183 धावांवर ऑलआऊट झाला. मुंबईने हा सामना 9 धावांनी जिंकला आहे.

मुंबई इंडियन्सच्या वतीने जसप्रीत बुमराह आणि गेराल्ड कोएत्झी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या स्पेलमध्ये पंजाब किंग्जला बॅकफूटवर आणले होते. दोघांनीही चांगली गोलंदाजी करत आपापल्या 4 षटकांत 3-3 बळी घेतले. बुमराह आता आयपीएल 2024 मध्ये 13 विकेट्स घेऊन पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आला आहे. त्यांच्याशिवाय हार्दिक पांड्या, आकाश मधवाल आणि श्रेयस गोपाल यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

News Title : PBKS vs MI Highlights, IPL 2024

महत्त्वाच्या बातम्या-

माझ्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून यायला नको!, वंचितच्या उमेदवाराने घेतली माघार

आज लखनौ विरुद्ध चेन्नई संघ भिडणार; कोण बाजी मारणार

बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोटो गायब, भाजपच्या सभेत शिवसैनिकांनी घातला राडा

सुनेत्रा पवारांनी कुणाकुणाला दिली मोठ्या रकमेची कर्ज?, नावं ऐकून धक्का बसेल…

अजित पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत सुनेत्रा पवार, संपत्तीचा आकडा आला समोर