विधानसभेला आमची पण गॅरंटी घ्या!; सुनील तटकरेंवर नाही शिंदेंच्या आमदाराचा विश्वास

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bharat Gogawale | रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी कालच (18 एप्रिल) त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्याकडे सादर केला. तर मविआचे उमेदवार अनंत गीते यांनी देखील त्यांचा अर्ज भरला आहे.

अर्ज दाखल करण्यापूर्वी अलिबाग रेवदंडा बायपास येथे डीकेटी शाळेच्या समोरील मैदानात महायुतीची प्रचार सभा झाली. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार महेंद्र दळवी, शिंदे सेनेचे पक्ष प्रतोद भरत गोगावले, भाजपचे धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते. या दरम्यान भरत गोगावले यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

‘तटकरेंना निवडून आणण्याची आम्ही गॅरंटी घेऊ, पण..’

रायगड लोकसभा मतदारसंघात तटकरे आणि गोगावले यांचे अगोदरपासूनच जरा टोकाचे संबंध होते. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे गट आणि भाजप यांचं सरकार स्थापन झालं. हा पहिला राजकीय भूकंप होता. यानंतर अजून दुसरा भूकंप घडत दोन चाकी सरकारला अजून एक चाक जुळलं. आता राज्यात शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप असं महायुतीचं सरकार आहे.

गोगावले (Bharat Gogawale) यांनी राष्ट्रवादी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर देखील तटकरे यांच्याशी जुळवून घेतलं नव्हतं. पण काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार रायगड दौऱ्यावर एकत्र आले असताना या दोघांमध्ये दिलजमाई केली होती. त्यानंतर त्यांच्यातील वाद मिटले. म्हणूनच दोघेही आता एकत्र कार्यक्रमात दिसून येतात.

भरत गोगावलेंची भावनिक साद

सुनील तटकरे यांच्या जाहीर सभेत आमदार भरत गोगावले यांनी आमची पण निवडून आणण्याची गॅरंटी घ्या, असं सांगत आपल्या भावना जाहीरपणे व्यक्त केल्या. त्यांच्या या विधानामुळे शिंदे गटाच्या या नेत्यांना खासदार सुनील तटकरे यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवणं अजूनही जड जातंय काय?, असा प्रश्न आता केला जात आहे.

‘घड्याळाच्या चिन्हाच्या समोरचा बटन दाबून आपल्याला महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मताधिक्याने निवडून आणायचं आहे’, असं म्हणत भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विकासाची जशी गॅरंटी आहे तशी खासदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आमची गॅरंटी घ्यावी, असं आवाहन केलं. या मतदार संघातून तटकरे यांना निवडून आणण्याची आमची (शिंदे गटाची) गॅरंटी असल्याचं ते म्हणाले.

News Title: Bharat Gogawale On Sunil Tatkare Lok Sabha 2024

महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत सुनेत्रा पवार, संपत्तीचा आकडा आला समोर

या राशीच्या व्यक्तीने नवीन कामात सावधानता बाळगावी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मोठा झटका, तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता जप्त

तीन दिवसांत घडलेल्या तीन घटनांनी पुणे हादरलं!

“हे राम, मामींना ऑस्कर देऊन टाका”, अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ट्रोल