“कोणी धमकी देत असेल तर मला फोन करा”, सुप्रिया सुळेंचं मतदारांना आवाहन

Baramati Lok Sabha | सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा निवडणुकीचा (Baramati Lok Sabha ) उमेदवारी अर्ज भरला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्याविरोधक सुनेत्रा पवार यांनी देखील आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार, नणंद विरूद्ध भावजय यांच्यात अधिकृत लढत होणार असल्याचं अंतिम झालंय. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर टीका केली. जर कोणी धमकी देत असेल तर मला फोन करा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय. अजित पवार हे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतलाय. (Baramati Lok Sabha )

“कौतुक वाटतं टिकेचं. घटस्फोट होऊन गेली सहा महिने झालेत. मात्र गेली 18 वर्षे आमच्या दोघांबद्दल न बोलणारे आज आमच्याबद्दल बोलत आहेत. असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. इलेक्शन जनतेच्या हातात आहे. लोकं म्हणतात धमकी येते, धमकी येत असेल तर फोन करा,” असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलंय. (Baramati Lok Sabha )

“महाविकास आघाडी आता प्रत्येक निवडणूक एकत्र लढवणार आहे. त्यांनी कितीही खालच्या पातळीवरील भाषण केलं तरीही आमच्या भाषणाची उंची वाढवत राहणार. माझी लढाई ही अदृश्य शक्तीसोबत आहे. शिरूरमध्ये फॉक्सॉन प्रकल्प इन्वेस्टमेंट येणार होती. 2 लाख रोजगार येणार होते. ते 2 लाख रोजगार सत्ताधाऱ्यांनी घालवले,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. (Baramati Lok Sabha)

“डंके की चोट पे संसदेत प्रश्न विचारू”

“अमोल कोल्हे आणि माझ्यावर अनेकदा टीका होतेय. ही निवडणूक जनतेनं हातात घेतलीये. ज्या कोणाला धमकीचा फोन येतोय त्यांनी माझा नंबर द्या. आम्ही डंके की चोट पे संसदेत प्रश्न विचारू. आजपर्यंत स्थानिक निवडणुकीत लक्ष घातलं नाही. कारण वडीलधारी मंडळी काम करत होते. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवायच्या आहेत. माझी लढाई ही अदृश्य शक्तीविरोधात आहे. चिन्ह बदललं पण आम्ही पक्ष चोरला नाही तरी आमचं चिन्ह चोरलं गेलं. शरादाबाई पवार यांची नात आहे. माझ्या आजीने मला रडायला नाही लढायला शिकवलंय,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. यानंतर शरद पवार यांनी देखील उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

“सत्तेचा उन्माद काय असतो हे सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिलं”

“आजचा उमेदवारीचा अर्ज भरण्याचा दिवस. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. 10 वर्षे सत्ता असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी लोकांना फसवलंय. 2014 ला नरेंद्र मोदी मध्येच आले. पेट्रोलच्या किंमतीचे दर 50 टक्के कमी करायचे होते. पण आज पेट्रोल हे 105 रूपये लिटर पेट्रोल आहे. सत्तेचा उन्माद काय असतो हे सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिलं. सत्ता असेल तर ती लोकांच्या भल्यासाठी असावी. लोकशाही वाचवण्यासाठी असावी”, असं शरद पवार म्हणालेत.

News Title – Baramati Lok Sabha In Supriya Sule On Ajit pawar Group

महत्त्वाच्या बातम्या

“हे राम, मामींना ऑस्कर देऊन टाका”, अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ट्रोल

“ही लढाई नाचीशी नाहीये, डान्सरशी नाहीये तर…”, नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांचा तोल सुटला

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिंदे गटानं का घेतली माघार?, उदय सामंत यांनी सांगितलं खरं कारण

पंकजा मुंडेंची मनोज जरांगेंवर पहिल्यांदाच टीका, थेट म्हणाल्या..

‘दोन-चार महिन्यात शिंदे..’, संजय राऊतांचा खळबळजनक दावा