पुण्यात दारुचा पूर, अबब!!! पुणेकरांनी वर्षभरात रिचवली 14 कोटी लिटर दारु

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात वेगवेगळ्या घटना घडत आहेत. कधी ड्रग्सचे प्रकरण तर कधी दिवसाढवळ्या गोळीबार, चाकूने वार अशा भयंकर घटना घडत आहेत. त्यामुळे सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?, असा प्रश्न पडतो आहे. अशात पुण्याबाबत अजून एक मोठी बातमी समोर आली आहे.

पुणेकर आता मद्याच्या प्रेमात पडले आहे. पुणे जिल्ह्यात एप्रिल 2023 ते मार्च 2024 या वर्षभरात तब्बल 14 कोटी 321 लिटर दारूची विक्री झालीये. यामध्ये मे महिन्यात जिल्ह्यात दारूची सर्वाधिक विक्री झाली. मागील वर्षापेक्षा पुणे जिल्ह्यात मध्यविक्रीत दुप्पटीने वाढली आहे.

पुण्यात दारु विक्री दुप्पट

पुण्यातील नागरिक पहाटे-पहाटे तर आरोग्याप्रती जागरूक दिसून येतात. सकाळी पुणेकर मॉर्निंग वॉक करताना विविध प्रकारचे ज्यूस पितात. पण रात्र झाली की यांची वेगळीच नशा सुरू होते. त्यामुळेच पुण्यात मद्यविक्री दुप्पट झाली आहे. पुणेकरांनी एकाच वर्षात 14 कोटी लिटर मद्य रिचवलंय.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने माहिती दिली आहे. त्यांच्यामते, पुण्यात एप्रिल 2023 ते मार्च 2024 या वर्षभरात 14 कोटी 321 लिटर दारूची विक्री झाली आहे. मागच्या वर्षीपेक्षा यात दुप्पट वाढ झाली आहे. पुणेकरांच्या या कार्यामुळे राज्याच्या तिजोरीला चांगलाच नफा झालाय.

वर्षभरात पुणेकरांनी रिचवली 14 कोटी लिटर दारू

पुणे जिल्ह्यात मध्यविक्रीत दुप्पटीने वाढली आहे. यामुळे राज्य शासनाला चांगला महसूल मिळाला आहे. शासनाची तिजोरी मद्यविक्रीतून भरली आहे. दारू विक्रीतून शासनाला मोठा महसूल मिळतो. पुण्यात बियरच्या विक्रीत तब्बल 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर वाईन विक्रीत 31 टक्क्याने वाढ झाली आहे.

पुण्यातील तरुण पिढीही आता व्यसनाच्या आहारी जात असल्याचं या अहवालामुळे म्हटलं जातंय. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात मद्य विक्रीचा हा विक्रमच म्हणावा लागेल. पुण्यात मध्यविक्रीत दुप्पटीने वाढ झाली आहे. हे चिंताजनक असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटत आहेत.

News Title: Pune News Liquor Sales Increase By 100 Percent

महत्त्वाच्या बातम्या-

माझी बदनामी व्हायला नको असं वाटत असेल तर लीड द्या!, अशोक चव्हाणांची कळकळीची विनंती

मोठी बातमी! ठाकरे गटातील ‘या’ बड्या नेत्याने केली राजकीय निवृत्तीची घोषणा

“कोणी धमकी देत असेल तर मला फोन करा”, सुप्रिया सुळेंचं मतदारांना आवाहन

होता रोहित म्हणून नाहीतर… हार्दिकच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स हारता हारता वाचली!

माझ्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून यायला नको!, वंचितच्या उमेदवाराने घेतली माघार