मला शक्तिप्रदर्शनाची अजिबात गरज नाही!, नारायण राणेंनी सांगितलं कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Narayan Rane | रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून अखेर (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) शिंदे गटाने माघार घेतली आहे. त्यामुळे महायुतीकडून भाजपा नेते नारायण राणे यांना लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा केला होता, मात्र आता शिंदे गटाने माघार घेतली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर करण्यासाठी उदय सामंत यांनी ताकद लावली होती. मात्र नारायण राणे यांनी निवडणूक लढवण्याबाबत निर्धार केला. शेवटी उदय सामंत यांना माघार घ्यावी लागली आणि या मतदारसंघाचा तिढा संपला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणे यांनी भाजप नेत्यांचे आभार मानले. आज 19 एप्रिलरोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

‘अडीच लाखांच्या फरकाने मी निवडून येणार’

त्यापूर्वी त्यांनी मोठं वक्तव्य केलं. ‘मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. पण, मला अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन करण्याची गरज भासणार नाही. माझं नाव जाहीर झाल्याचं ज्यांना समजलं ते सगळे फॉर्म भरायला येतील.अडीच लाखांच्या फरकाने मी निवडून येणार आहे’, असा दावाच यावेळी राणे (Narayan Rane) यांनी केला आहे.

त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारसभा, बैठका, कार्यक्रमांचा धडाका सुरू केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार, विद्यमान खासदार विनायक राऊत यांनीही प्रचार, बैठका, सभांचा कार्यक्रम सुरू केला आहे. राणे सभाद्वारे कोकणातील विकासाच्या मुद्द्यावर भर देत आहेत. आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते अजून जोरदार सभा घेतील.

राणेंच्या उमेदवारीवरून शिवसैनिक नाराज

दरम्यान , नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली असली तरी शिंदे गटातील काही कार्यकर्ते यामुळे नाराज आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत व किरण सामंत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणे (Narayan Rane) यांना आपला पाठिंबा जाहीर केला असूनही पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

इतकंच नाही तर रत्नागिरी युवा सेनेच्या तीन जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. याची देखील राजकारणात चर्चा होऊ लागली आहे.त्यामुळे सामंत बंधू आपल्या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करतात, हे पाहावं लागेल.

News Title : Narayan Rane Big Statement on Election 

महत्त्वाच्या बातम्या-

आज लखनौ विरुद्ध चेन्नई संघ भिडणार; कोण बाजी मारणार

बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोटो गायब, भाजपच्या सभेत शिवसैनिकांनी घातला राडा

सुनेत्रा पवारांनी कुणाकुणाला दिली मोठ्या रकमेची कर्ज?, नावं ऐकून धक्का बसेल…

अजित पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत सुनेत्रा पवार, संपत्तीचा आकडा आला समोर

या राशीच्या व्यक्तीने नवीन कामात सावधानता बाळगावी