माझी बदनामी व्हायला नको असं वाटत असेल तर लीड द्या!, अशोक चव्हाणांची कळकळीची विनंती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ashok Chavan | माजी काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपत सामील झाले आहेत. आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने चव्हाण प्रचारसभा घेण्यात व्यस्त आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी देखील अशोक चव्हाण सभा घेत आहेत. अशातच त्यांनी एका सभेदरम्यान मोठं वक्तव्य केलं.

‘माझी बदनामी व्हायला नको असं वाटत असेल तर लीड द्या’, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. राजकारणात त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होते आहे. मतदारांना संबोधित करताना अशोक चव्हाण यांनी मतदारांना आवाहन केलं.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

‘आज देशामध्ये नरेंद्र मोदींची हवा आहे. विकसित भारतासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी मी नांदेडच्या सीटची गॅरंटी दिलीये. तुम्ही सर्वांनी मिळून गावागावात लीड दिलीच पाहिजे. येहळेगाव हे माझ्या कारखान्याच्या हद्दीतील गाव असून, येथून लीड देण्याची तुमची जबाबदारी आहे,’ असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

तसंच पुढे ते म्हणाले की, वरिष्ठ नेत्यांकडे माझी बदनामी होऊ नये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर जास्तीत जास्त मतं द्या, अशी भावनिक साद माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घातली. यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेत अजून एक वक्तव्य केलं.

मराठा युवकांना चव्हाण यांचं आवाहन

राजकारण अन् समाजकारण वेगवेगळ्या बाजू असून, आपण कोणत्याही पक्षाच्या बाजूने नसल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. काही गावात जाणीवपूर्वक नेत्यांना विरोध करून मराठा आरक्षण चळवळ बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. त्याला मराठा युवकांनी बळी पडू नये, असं चव्हाण (Ashok Chavan) यांनी म्हटलं.

मागे नांदेडमधील भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण एका गावात गेले होते. तेव्हा मराठा आरक्षणावरून गावकऱ्यांनी त्यांना चांगलंच घेरलं होतं. चव्हाण यांना तिथल्या नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. पण घोषणाबाजी आणि आंदोलकांचा रोष पाहून अशोक चव्हाणांना गावातून काढता पाय घ्यावा लागला होता.

News Title:  Ashok Chavan Big statement on Nanded LokSabha Constituency

महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत सुनेत्रा पवार, संपत्तीचा आकडा आला समोर

या राशीच्या व्यक्तीने नवीन कामात सावधानता बाळगावी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मोठा झटका, तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता जप्त

तीन दिवसांत घडलेल्या तीन घटनांनी पुणे हादरलं!

“हे राम, मामींना ऑस्कर देऊन टाका”, अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ट्रोल