शिवसेनेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार!, पारंपरिक युतीतला हक्काचा मतदारसंघ गमावला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shivsena BJP Seat Sharing | राज्यात सध्या महायुतीचं सरकार असून यात शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपा या पक्षांची युती आहे. आता लोकसभा निवडणुकीमुळे या तिन्ही पक्षांत जागावाटपवरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येतंय. ज्या ठिकाणी शिवसेनेचा गड मानला जायचा आज त्या जागा भाजपने आपल्या नावावर केल्या आहेत. तर काही जागा या नव्यानेच सामील झालेल्या अजित पवार गटाला मिळाल्या आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला होता. येथे उदय सामंत आणि किरण सामंत यांनी दावा सांगितला होता. त्यांनी इथे जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं. पण याचा काही फायदा झाला नाही. युती असल्याने शिंदे गटाला माघार घ्यावी लागली आणि भाजपने ही सीट आपल्या नावे केली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपच्या वाट्याला

येथे भाजप नेते नारायण राणे यांना लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. त्यामुळे उदय सामंत यांचे बंधू आणि शिंदे गटातील उमेदवारीचे दावेदार किरण सामंत यांना माघार घ्यावी लागली. भाजपने काल 18 एप्रिल रोजी आपली लोकसभा उमेदवारांची तेरावी यादी जाहीर करताना नारायण राणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं.

राज्यात भाजपने जाहीर केलेले राणे हे 26 वे उमेदवार आहेत. त्यामुळे आता येथे राणे आणि महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात सामना होईल. आज राणे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शिवसेनेतील फुटीचा राजकीय फायदा उठवत भाजपने अमरावती पाठोपाठ रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघही (Shivsena BJP Seat Sharing) आपल्याकडे घेतला. तसंच यापूर्वी एकत्रित शिवसेना लढवत असलेला धाराशिवचा मतदारसंघ भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिला आहे.

धाराशिवचा मतदारसंघ अजित पवार गटाला

आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेल्याने शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे आणि पालघर हे दोन मतदारसंघ मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं जातंय. तसंच औरंगाबाद व नाशिकसह भाजप आणि शिंदे गटात ज्या जागांवर तिढा निर्माण झाला आहे तो येत्या आठवडाभरात सोडवून, उर्वरित सातही मतदारसंघांतील महायुतीचे उमेदवार जाहीर होतील, अशी माहिती आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काम केलेले नारायण राणे आता तब्बल नऊ वर्षांनंतर आपला राजकीय जनाधार आजमावणार आहेत. राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून (Shivsena BJP Seat Sharing) उमेदवारी मिळाल्याने शिंदे गटाला ठाण्याची जागा मिळणार असल्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जात आहे.

News Title :  Shivsena BJP Seat Sharing

महत्त्वाच्या बातम्या-

माझ्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून यायला नको!, वंचितच्या उमेदवाराने घेतली माघार

आज लखनौ विरुद्ध चेन्नई संघ भिडणार; कोण बाजी मारणार

बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोटो गायब, भाजपच्या सभेत शिवसैनिकांनी घातला राडा

सुनेत्रा पवारांनी कुणाकुणाला दिली मोठ्या रकमेची कर्ज?, नावं ऐकून धक्का बसेल…

अजित पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत सुनेत्रा पवार, संपत्तीचा आकडा आला समोर