मुंबई इंडियन्सचा तिसरा विजय, पण एका चुकीमुळे पांड्याला भरावा लागणार दंड

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | मुंबई इंडियन्स विरूद्ध किंग्ज पंजाब सामन्यात मुंबईने यंदाच्या आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये तिसरा  विजय मिळवला. पांड्याच्या नेतृत्वामध्ये संघ खेळत आहे. पहिल्या तिन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यानंतर तीन विजय मिळवले. सीएसके विरूद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यात मुंबईला चौथ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पंजाब किंग्ज विरोधात मुंबईने बाजी लावून तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला. मात्र संघाचं नेतृत्व करणारा कर्णधार हार्दिक पांड्याच्या अडचणीत वाढ झाली.

हार्दिक पांड्या जरी मुंबई इंडियन्स संघाचा नेतृत्व करत असला तरीही त्याला नेहमी वाईट गोष्टींचा सामना करावा लागतोय. संघाचा पराभव झाला तरीही त्यालाच जिम्मेदार ठरवलं जातंय. संघ विजयी झाला तर रोहितची अनेकजण प्रशंसा करताना दिसत आहे. मुंबईने जरी तिसरा विजय मिळवला असला तरीही पांड्याने केलेल्या एका चुकीमुळे त्याला 12 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. (IPL 2024)

हार्दिक पांड्याला 12 लाखांचा दंड

मुंबई इंडियन्स विरूद्ध पंजाब किंग्ज सामन्यात पांड्या गोलंदाजी करत असताना त्याला गोलंदाजीचा रेट सांभाळता आला नाही. त्याने स्लो ओव्हर रेट गोलंदाजी केली. यामुळे हार्दिक पांड्याला 12 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.

अशुतोषच्या 61 धावा, मात्र किंग्ज पंजाबचा पराभव

मुंबई इंडियन्स संघाने सुरूवातीला फलंदाजी करत 192 धावा केल्या. किंग्ज पंजाबला 193 धावांचं लक्ष देण्यात आलं. त्यातील किंग्ज पंजाबने 183 धावा केल्या. सुरूवातीला किंग्ज पंजाबची म्हणावी अशी कामगिरी नव्हती. अशुतोष शर्माने चांगली कामगिरी केली. अशुतोषने 61 धावा केल्या, मात्र किंग्ज पंजाबचा पराभव झाला.

मुंबई इंडियन्सने तीन सामने जिंकले असून गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. मुंबईने दिल्लीविरूद्ध, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि पंजाब किंग्ज विरूद्ध विजय मिळवला. येत्या 22 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे.

News Title – IPL 2024 In Hardik Pandya 12 Lakh Rupees Fine Of Slow Over Rate

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेनेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार!, पारंपरिक युतीतला हक्काचा मतदारसंघ गमावला

माझी बदनामी व्हायला नको असं वाटत असेल तर लीड द्या!, अशोक चव्हाणांची कळकळीची विनंती

मोठी बातमी! ठाकरे गटातील ‘या’ बड्या नेत्याने केली राजकीय निवृत्तीची घोषणा

“कोणी धमकी देत असेल तर मला फोन करा”, सुप्रिया सुळेंचं मतदारांना आवाहन

होता रोहित म्हणून नाहीतर… हार्दिकच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स हारता हारता वाचली!