आधी गणपतीचं दर्शन आता दर्ग्यावर चढवली चादर, सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अजित पवार अॅक्टिव्ह मोडवर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवाकी अर्ज काल भरण्यात आला. तर दुसरीकडे अजित दादांनी प्रचाराला जोर लावल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यात उमेदवारीचा अर्ज भरण्याआधी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेत आरती केली. त्यानंतर आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी धाराशिव येथे हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्ग्याला भेट दिली. (Ajit Pawar)

अजित पवार यांची दर्ग्याला भेट

धाराशिव येथील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा प्रसिद्ध आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये येथे उरूस असतो. अनेकजण या उरूसाला येतात. सध्या अजित पवार (Ajit Pawar) हे धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. हजरत ख्वाजा शमशोद्दीन यांच्या मजारावर चादर चढवली आणि प्रार्थना केली.

Screenshot 2024 04 19 140903

डोक्यावर पांढरी टोपी आणि हातात फुलांची चादर घेत अजित पवार दर्ग्यात आले. त्यांच्यासोबत राणा जगजीतसिंह, अर्चना पाटील आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते. दर्गा समितीच्या वतीने दादांचा सत्कार करण्यात आला. धाराशिव शहराच्या आहिल्या चौकामध्ये अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्ग्या हा देशात प्रसिद्ध असलेला दर्गा आहे. अनेक हिंदू-मुस्लिम लोकं उरूसादिवशी आपली उपस्थिती दाखवतात.

“मोठा विजय होऊ दे”, दगडूशेठ गणपतीला साकडं

अजित पवार आणि सुनेत्रा पवार या काल पुण्यात होत्या. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी आरती देखील केली. “मोठा विजय होऊ दे असं साकडं देवाला घातलं”, असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्यात.

News Title – Ajit Pawar Tour Dharashiv In Dargah Hazrat Khwaja Shamsuddin Gazi Rahmatullah Alaihi

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दारुचा पूर, अबब!!! पुणेकरांनी वर्षभरात रिचवली 14 कोटी लिटर दारु

मला शक्तिप्रदर्शनाची अजिबात गरज नाही!, नारायण राणेंनी सांगितलं कारण

Yamaha ने लाँच केली चावीशिवाय सुरू होणारी स्कुटर; जाणून घ्या किंमत

शिवसेनेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार!, पारंपरिक युतीतला हक्काचा मतदारसंघ गमावला

माझी बदनामी व्हायला नको असं वाटत असेल तर लीड द्या!, अशोक चव्हाणांची कळकळीची विनंती