आईच्या दुसऱ्या लग्नाबाबत थेट बोलला मलायका अरोराचा मुलगा, म्हणाला…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Malaika Arora | मनोरंजन क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. अनेकदा अभिनेत्री-अभिनेत्याचं ब्रेकअप होतं, तर कोणाचं पॅचअप होतं. तर कोण घटस्फोट घेतं. तर कोणी तीन-तीन लग्न करतं. मनोरंजन विश्वामध्ये या गोष्टी अधिक घडताना दिसतात. गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) अनेक कारणाने चर्चेत आहे.

मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतीये. तसेच मलायका लवकरच त्याच्यासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. अशात मलायकाच्या लग्नाबाबत मलायकाचा मुलगा अरहान स्पष्ट बोलला आहे.

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाज खानचा लेक अरहान खान याने आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या आईची मुलाखत घेतली. त्यामध्ये मलायकाने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. अरबाज खाननंतर मलायकाचं आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचं अनेक महिने अफेअर सुरू आहे. या पॉडकास्टमध्ये अरहानने आईला अनेक प्रश्न विचारले.

“तु लग्न कधी करणार आहेस?”

पॉडकास्टमध्ये मुलाखत घेत असताना अरहानने मलायकाला विचारलं की संपूर्ण जगाला महिती हवी आहे की तु दुसरं लग्न कधी करणार आहे? मला तुझ्या लग्नाची तारीख हवी आहे. मला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. यावर मलायकाने उत्तर दिलं आहे.

मुलाने मलायकाला तु दुसरं लग्न कधी करणार?, असा सवाल केल्यानंतर ती म्हणाली की, “मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. कारण याप्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये. मी काय उत्तर देऊ?”, असा सवाल केलाय. “मला वाटतं की सध्या मी माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट टाईम जगत आहे.”

मलायकाची ही सवय लेकाला आवडत नाही

यावेळी मलायकाने आपल्या लेकाला माझ्यातली कोणती गोष्ट आवडत नाही? असा सवाल केला. तेव्हा लेक अरहानने सांगितलं की, “तुझ्या कामात अगदी एकाग्र असते. तुझ्या कामात तु बिजी असते. तर तु स्वत:साठी वेळ काढायला हवा,” असं अरहान म्हणालाय.

News Title – Malaika Arora,s Son Arahan Khan Tell Question To Malaika About Her Second Marriage

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मोठा झटका, तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता जप्त

तीन दिवसांत घडलेल्या तीन घटनांनी पुणे हादरलं!

“हे राम, मामींना ऑस्कर देऊन टाका”, अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ट्रोल

“ही लढाई नाचीशी नाहीये, डान्सरशी नाहीये तर…”, नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांचा तोल सुटला

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिंदे गटानं का घेतली माघार?, उदय सामंत यांनी सांगितलं खरं कारण