‘सुनेला हिणवणाऱ्या पवारांना सीतामाईंचा कळवळा म्हणजे ढोंगच’, भाजपचा टोला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chandrashekhar Bawankule | माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बाहेरच्या म्हटलं होतं. तर, नुकतंच त्यांनी अयोध्यामधील राम मंदिरात प्रभू श्रीरामाची मूर्ती तर आहे पण येथे सीतामाईची मूर्ती का नाही?, असा सवाल भाजपला केला. यावरून आता भाजपकडून शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यात आलंय.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर निशाणा साधत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) याबाबत एक पोस्ट करत पवारांना प्रत्युत्तर दिलं. घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना सीतामाईंबद्दल कळवळा कसा?, असा खोचक सवाल बावनकुळे यांनी केला आहे.

‘निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला..’

‘राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात. शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं’, असा टोला बावनकुळे यांनी ट्वीट करत लगावला आहे.

‘राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल’, अशी टीका देखील चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या पोस्टमध्ये केली आहे.

“राममंदिर उभारलं गेल्यानं पवारांना पोटदुखी”

दरम्यान, भाजपच्या अधिकृत ट्वीटर पेजवरही शरद पवारांना टार्गेट करण्यात आलंय. आयुष्यभर ज्यांनी राममंदिराला विरोध केला, तेच आज राममंदिराबद्दल बोलत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे वक्तव्यं करून देशातील तमाम रामभक्तांच्या भावनांना ठेच पोहचवण्याचं काम ते करत आहेत, असा आरोप भाजपने शरद पवारांवर केलाय.

इतकंच नाही तर मागेदेखील भर सभेत शरद पवारांनी देशाला ‘रामायण महाभारताची’ गरज नाही, असं संतापजनक वक्तव्य केलं होतंच मात्र आता अयोध्येतील राममंदिरात ‘सीतामातेची मूर्ती का नाही’, असा पोरकट प्रश्न विचारून त्यांनी रामभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्यदिव्य राममंदिर उभारलं गेलंय याची पोटदुखी शरद पवारांना होत असावी तसेच समोर पराभव दिसुन येत असल्याने असे मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल ते करत आहेत, अशी टीका भाजपने केली आहे.

News Tittle : Chandrashekhar Bawankule Slammed Sharad Pawar  

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला पराभवाची धास्ती!, जे लीड देणार नाहीत त्यांना… थेट आमदारांना मिळाली तंबी

पुण्यात दारुचा पूर, अबब!!! पुणेकरांनी वर्षभरात रिचवली 14 कोटी लिटर दारु

मला शक्तिप्रदर्शनाची अजिबात गरज नाही!, नारायण राणेंनी सांगितलं कारण

Yamaha ने लाँच केली चावीशिवाय सुरू होणारी स्कुटर; जाणून घ्या किंमत

शिवसेनेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार!, पारंपरिक युतीतला हक्काचा मतदारसंघ गमावला