या राशीच्या व्यक्तींने प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवावे

Today Horoscope l मेष:- घरातील वातावरण चांगले राहील. मुलांसोबत मजेत वेळ घालवाल. काही धार्मिक विधींनी मनाला शांती मिळेल. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. मनातील इच्छा बोलून दाखवाल.शुभ रंग निळा शुभ अंक ३

वृषभ:- आपल्याला हवी असणारी उत्तरे मिळतील. नवीन योजनांसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. पुढील गोष्टींचे नियोजन करावे लागेल. मानसिक शांतता लाभेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.शुभ रंग पांढरा शुभ अंक ८

मिथुन:- जुनी उधारी वसूल होईल. घरातील वातावरण चांगले राहील. जवळच्या ठिकाणी प्रवास घडेल. भावंडांची चांगली मदत होईल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील.शुभ रंग पिवळा शुभ अंक ५

कर्क :- मानसिक चंचलता जाणवेल. नवीन कामासाठी चांगला वेळ. हातातील काम फलदायी असेल. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल. व्यापारी वर्गाला चांगला दिवस.शुभ रंग नारंगी शुभ अंक १

सिंह :- व्यावसायिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवा. दिवस आपल्या मनासारखा घालवाल. कार्यक्षेत्रात वाढीव मेहनत घ्यावी लागेल. वडिलांचे सहकार्य प्राप्त होईल.शुभ रंग काळा शुभ अंक ७

कन्या:- मित्रांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. घरात धार्मिक वातावरण राहील. बोलताना तारतम्य बाळगा. संयमाने परिस्थिती हाताळावी. कौटुंबिक खर्चाला आळा घालावा.शुभ रंग पिवळा शुभ अंक ४

Today Horoscope l तूळ:- आपल्याच धुंदीत दिवस घालवाल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल. मनातील इच्छेला अधिक महत्त्व द्याल. नवीन प्रकल्पावर काम सुरू करावे. व्यावसायिकांना चांगला लाभ होईल.शुभ रंग हिरवा शुभ अंक ९

वृश्चिक :- अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणुकीला चांगला काळ आहे. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. कामातील समस्या दूर होतील. नवीन ओळख होईल.शुभ रंग जांभळा शुभ अंक ३

धनू:- नातेवाईकांच्या होकारात होकार मिसळू नका. स्वत: तारतम्य बाळगून विचार करावा. कामाच्या ठिकाणी फक्त आपल्या कामाकडेच लक्ष द्यावे. राजकारणापासून दूर राहावे. मित्रांसाठी मदतीचा हात पुढे कराल.शुभ रंग निळा शुभ अंक २

मकर :- काम आणि वेळ यांचा समन्वय साधावा. चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालू नका. नियमांचे काटेकोर पालन करा. अतिविचार करत बसू नका. भावंडांची बाजू समजून घ्यावी.शुभ रंग लाल शुभ अंक ६

Today Horoscope l कुंभ :- कामाच्या बदललेल्या स्वरूपाशी जुळवून घ्या. समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. व्यापारी वर्गाला चांगला दिवस. भागीदारीच्या व्यवसायात काटेकोर राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.शुभ रंग पांढरा शुभ अंक ९

मीन :- अंग मेहनतीला मागे हटु नका. मित्रांची बरेच दिवसांनी गाठ पडेल. नवीन संपर्कातून काही गोष्टी समोर येतील. नोकरदारांना दिवस समाधानकारक जाईल. संयमाने कामे करावीत.शुभ रंग पिवळा शुभ अंक ३

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे फेकली वस्तू, नेमकं काय घडलं?

नाची, डान्सर, बबली म्हणणाऱ्या राऊतांना नवनीत राणांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

‘सुनेला हिणवणाऱ्या पवारांना सीतामाईंचा कळवळा म्हणजे ढोंगच’, भाजपचा टोला

बसमध्ये तरूणी आली बिकिनी घालून, व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

प्रदर्शनापूर्वीच ‘पुष्पा’चा जलवा, कमावले तब्बल 500 कोटी रुपये