DC vs SRH l आयपीएल 2024 च्या 35 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) चा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) सोबत होणार आहे. आयपीएलच्या चालू हंगामात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघाने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत, तर 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
DC vs SRH l दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी कशी खेळेल? :
हैदराबाद संघाने शेवटच्या सामन्यात आरसीबीचा 25 धावांनी पराभव केला होता. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 6 गडी राखून पराभव केला आहे. अशातच आता दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाचा सामना पॅट कमिन्स संघाशी होणार आहे. चालू मोसमात दिल्ली प्रथमच आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळणार आहे. अशा परिस्थितीत, दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी कोणाच्या बाजूने असणार आहे हे जाणून घेउयात.
अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम दिल्लीच्या खेळपट्टीवर फलंदाज धडपडताना दिसतात. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना खूप मदत मिळते. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजांचीही मदत मिळते. लहान मैदानामुळे फलंदाज भरपूर चौकार-षटकार मारताना दिसतात. आयपीएलच्या इतिहासात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर एकूण 86 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी यजमान संघाने 40 सामने जिंकले, तर पाहुण्या संघाने 44 सामने जिंकले आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सर्वाधिक धावसंख्या 188 धावांची होती, तर सर्वात कमी धावसंख्या 128 होती.
DC विरुद्ध SRH सामन्याची संपूर्ण माहिती :
IPL 2024 मध्ये DC विरुद्ध SRH सामना कधी होणार? :
आयपीएल 2024 चा 35 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 20 एप्रिल रोजी खेळवला जाईल.
IPL 2024 चा 35 वा सामना कुठे खेळवला जाईल? :
दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल.
DC विरुद्ध SRH सामना किती वाजता सुरू होईल? :
आयपीएल 2024 चा 35 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. टॉस अर्धा तास आधी होईल.
DC विरुद्ध SRH सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पहावे? :
तुम्ही स्टार स्पोर्ट्स चॅनलवर टीव्हीवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा थेट सामना पाहू शकता.
DC विरुद्ध SRH सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता? :
जिओ सिनेमा ॲपवर तुम्ही दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
News Title – DC vs SRH Pitch Report
महत्त्वाच्या बातम्या –
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळी सुट्या जाहीर; किती दिवस सुट्या?
“एकनाथ शिंदेंचं काम संपलं, पुढच्या 2 महिन्यात…”, आंबेडकरांचा खळबळजनक दावा
3 अक्षरी उद्योजकामार्फत मला निरोप आला होता!, निलेश लंकेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट
हा झेल नाही पाहिला तर काय पाहिलं?, रवींद्र जडेजानं घेतलेल्या झेलची तुफान चर्चा
“मी सध्या अजित पवार गटात आहे, मात्र अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार”