मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मोदी पुण्यात येणार, तारीख आली समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune Lok Sabha | पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Lok Sabha) हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे. अनेकांच्या नजरा या मतदारसंघाकडे लागल्या आहेत. पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघामध्ये त्रिकुट पाहायला मिळणार आहेत. भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ, तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीये

पुण्यात मोदींची सभा, तारीख आली समोर

पुणे येथे एसपी रोडच्या मैदानावर ही प्रचारसभा होणार आहे. अनेकांचं लक्ष या लोकसभा निवडणुकीकडं लागलं आहे. ‘मिशन 45 प्लस’ हे धोरण भाजपने अधिकच मनावर घेतलं आहे. याआधी नरेंद्र मोदी हे विदर्भात सभेसाठी आले होते. त्यानंतर आता मोदी हे पुण्यात येणार आहेत. 29 एप्रिलला पंतप्रधानांची सभा होणार आहे. (Pune Lok Sabha)

पुण्यात कोणताही रोडशो होणार नाही. फक्त प्रचारसभा होणार आहे. पुण्यात (Pune Lok Sabha) प्रचारसभेमध्ये मोदी पुणेकरांना काय आवाहन करणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे. पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा झाली. पुण्यातून मुरलीधर मोहोळ निवडणूक गाजवणार अशी चर्चा असताच, महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकरांसारखा मोहरा बाहेर काढला. यामुळे आता भाजपच्या टेन्शनमध्ये वाढ झालीये.

रवींद्र धंगेकर यांनी 40 वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबावर ताबा मिळवला. धंगेकर यांच्यामुळे आता भाजपने आपली ताकद पाणाला लावली आहे. यामुळेच आता भाजपच्या इतर मोठ्या नेत्यांसोबत नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत प्रचारसभा घेण्यात येणार आहे. मोदी पुणे मतदारांना मतदानाचं आवाहन करणार आहे.

पुण्यात तिरंगी लढत

पुण्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर, महायुतीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना संधी देण्यात येणार आहे. तिन्ही उमेदवार पुण्यामध्ये तगडे मानले जात आहेत. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी पुण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी सभा घेणार असल्याची शक्यता आहे.

News Title – Pune Lok Sabha In Narendra Modi Visit For Murlidhar Mohol Campaign

महत्त्वाच्या बातम्या

बसमध्ये तरूणी आली बिकिनी घालून, व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

प्रदर्शनापूर्वीच ‘पुष्पा’चा जलवा, कमावले तब्बल 500 कोटी रुपये

आईच्या दुसऱ्या लग्नाबाबत थेट बोलला मलायका अरोराचा मुलगा, म्हणाला…

आधी गणपतीचं दर्शन आता दर्ग्यावर चढवली चादर, सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी अजित पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये

मुंबई इंडियन्सचा तिसरा विजय, पण एका चुकीमुळे पांड्याला भरावा लागणार दंड