बारामतीसाठी अजित पवारांचं सपशेल लोटांगण, फडणवीस सांगतील ती पूर्व दिशा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (20 एप्रिल) इंदापुरात मेळावा घेतला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील तसंच अजित पवारांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. इंदापुरात अजित पवार यांनी केलेलं एक विधान चर्चेत आलं आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभा निवडणुका आहेत. विधानसभेत आम्ही सांगू तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल, असं फडणवीसांनी मला सांगितलंय आणि मी ते मान्य केल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे बारामतीसाठी अजित दादांनी सपशेल लोटांगण घेतल्याचं राजकरणात म्हटलं जात आहे.

अजित पवारांचं मोठं वक्तव्य

लोकसभेसाठी महायुतीमध्ये जागा वाटपवरून बऱ्याच ठिकाणी तिढा निर्माण झाला.काही नेत्यांनी तर उमेदवारी न मिळाल्याने थेट बंडखोरी केली आहे. ज्या जागा पूर्वी राष्ट्रवादी किंवा शिंदे गटाचा बालेकिल्ला होत्या त्या जागा आता भाजपाने हिसकावून घेतल्या आहेत.त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत सध्या जास्त बोललं जात आहे. अशात विधानसभेसाठी फडणवीसांनी आतापासूनच फिल्डिंग लावल्याचंही आता म्हटलं जातंय.

“गेल्या 10 वर्षांत बारामती लोकसभा मतदारसंघात किती निधी आला, याचा विचार करा. महायुतीचा उमेदवार निवडून द्या. पाच वर्षांत यापेक्षा अधिक निधी आणू, अशी ग्वाही देत आगामी काळात महायुतीत जे ठरेल, ते मी पाळेन आणि मी शब्दाचा पक्का आहे,”,असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

विधानसभेसाठी फडणवीसांची आतापासूनच फिल्डिंग?

‘जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळाला मतदान करायचं आणि जिथं कमळ असेल तिथं कमळाला आणि जिथं धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाणाला मतदान करायचं.’, असंही अजित पवार म्हणाले. सगळेजण महायुतीचे काम करतील.मला अजून दोन बैठका घ्यायच्या आहेत. त्यामध्ये एक माढ्याची आहे आणि दुसरी भोरची आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

इंदापूरमध्ये अजित पवार यांनी सहकुटुंब भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या घरी स्नेहभोजन केलं. 2004 ते 2019 पर्यंत हर्षवर्धन पाटील यांच्याशी मी चर्चा करत नव्हतो. ते आमच्या वरिष्ठांशी चर्चा करत होते असंही अजित पवार म्हणाले. तसंच इंदापूरमध्ये संयुक्त सभा असतील त्याला मी उपस्थित राहणार असल्याचंदेखील पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं.

News Title : Ajit Pawar statement on assembly elections 2024

महत्त्वाच्या बातम्या – 

“एकनाथ शिंदेंचं काम संपलं, पुढच्या 2 महिन्यात…”, आंबेडकरांचा खळबळजनक दावा

3 अक्षरी उद्योजकामार्फत मला निरोप आला होता!, निलेश लंकेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट

हा झेल नाही पाहिला तर काय पाहिलं?, रवींद्र जडेजानं घेतलेल्या झेलची तुफान चर्चा

“मी सध्या अजित पवार गटात आहे, मात्र अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार”

या राशीच्या व्यक्तींने प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवावे