जुन्या जखमा अजून भरलेल्या नाहीत!, पाटलांच्या पोरीच्या वक्तव्याने अजित पवारांच्या पोटात गोळा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ankita Patil | माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. इंदापुरात आज (20 एप्रिल) अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यात अजित पवार यांनी संपूर्ण कुटुंबासोबत हजेरी लावली. या मेळाव्यापूर्वी अंकिता पाटील यांनी अजित दादांबद्दल मोठं विधान केलं होतं.

“आमच्या जुन्या जखमा अजूनही भरल्या नाहीयेत. 2014 आणि 2019 जे घडले त्याच्या जखमा अजून आहेत. 20 वर्ष आमचा संघर्ष राष्ट्रवादीशी झाला आहे. पुढे विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती धर्म सगळ्यांनी पाळला पाहिजे. काही गोष्टी आपल्याला निकाल लागल्यावर बसून करायच्या आहेत”, असं अंकिता पाटील म्हणाल्या आहेत. त्यावर अजित पवार यांनीही मेळाव्यात प्रत्युत्तर दिलं.

अंकिता पाटील यांचं मोठं वक्तव्य

अंकिता पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दलही मोठं विधान केलं. ‘निवडणुकीत सुनेत्रा काकी उभ्या राहिल्यात पण मला असं वाटतं की, माझी आई उभी राहिलीये. आता आमची नाराजी दूर झाली आहे, काही उरली सुरली राहिली असेल तर ती आता दूर होईल’, असं अंकिता पाटील म्हणाल्या.

‘मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. कार्यकर्त्यांचे भरपूर प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिली होती. त्यांचा आणि आमचा संघर्ष पिढ्यानपिढ्या सुरू आहे. आता अजित दादा येणार असल्याने कार्यकर्त्यांची नाराजी दूर होईल’, असा विश्वास अंकिता पाटील (Ankita Patil) यांनी व्यक्त केला.

‘महायुतीत जे ठरेल ते पाळणार’

दरम्यान, आजच्या आयोजित मेळाव्यात अजित पवार यांनी महायुती धर्माबद्दल मंचावर बोलून दाखवलं. “गेल्या 10 वर्षांत बारामती लोकसभा मतदारसंघात किती निधी आला, याचा विचार करा. महायुतीचा उमेदवार निवडून द्या. पाच वर्षांत यापेक्षा अधिक निधी आणू, अशी ग्वाही देत आगामी काळात महायुतीत जे ठरेल, ते मी पाळेन आणि मी शब्दाचा पक्का आहे,”असं अजित पवार म्हणाले.

तर, हर्षवर्धन पाटील यांनीही “इंदापूरचे पालकत्व फडणवीस व अजित पवार यांनी घेतलं आहे. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. तसंच  तालुक्याच्या काही भागात वीज कपात करण्यात आली. यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मोदींचे हात बळकट करण्यासाठी भाजपच्या कमळरूपी घड्याळाला मतदान करा”, असं आवाहन केलं.

News Title : Ankita Patil on Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या – 

“एकनाथ शिंदेंचं काम संपलं, पुढच्या 2 महिन्यात…”, आंबेडकरांचा खळबळजनक दावा

3 अक्षरी उद्योजकामार्फत मला निरोप आला होता!, निलेश लंकेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट

हा झेल नाही पाहिला तर काय पाहिलं?, रवींद्र जडेजानं घेतलेल्या झेलची तुफान चर्चा

“मी सध्या अजित पवार गटात आहे, मात्र अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार”

या राशीच्या व्यक्तींने प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवावे