भाजपकडून भीती दाखवली जातेय!, अजित पवार गटाच्या नेत्याचे धक्कादायक आरोप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uttam Jankar | माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठे धक्के बसले आहेत. येथे प्रथमच मोहिते पाटलांचे संपूर्ण घराणे सोडून गेल्याने भाजपला याचा निवडणुकीत मोठा फटका बसणार आहे. माढामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सामना भाजप उमेदवार रणजित निंबाळकर यांच्याशी होणार आहे.

धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत बंधू रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्यातील बंडखोरी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, हे प्रयत्न सपशेल फोल ठरले. निंबाळकर यांना लोकसभेचं तिकीट दिल्याने मोहिते पाटील नाराज होते. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शरद पवारांचा हाथ धरला. पाटलांच्या बंडखोरीमुळे माढ्यात भाजपला तगडं आव्हान मिळालंय.

उत्तम जानकर यांचा सरकारला इशारा

बंडखोरीविरोधात भाजपने मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला. पण, हा प्रयत्नदेखील अपयशी ठरला. माळशीरमधील मोहिते पाटील घराणे आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्यातील 30 वर्षांचं वैर संपुष्टात आलं आहे. जानकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांसाठी जाहीर सभा घेत धक्कादायक खुलासे केले आहेत.

भाजपने धैर्यशील मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली असून हा गुन्हा दाखल झाला तर उमेदवार असल्यासारखा संपूर्ण मतदारसंघ पालथा घालून धैर्यशील यांना निवडून आणणार आणि जेल फोडून त्यांची विजयी मिरवणूक काढणार, असा थेट इशाराच उत्तम जानकर (Uttam Jankar ) यांनी भाजपला तथा सरकारला दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता एकच चर्चा रंगली आहे.

उत्तम जानकर यांचा धक्कादायक खुलासा

गेल्या आठ दिवसांपासून मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूये. 2020 मधील प्रकरण आज निवडणुकीमुळे समोर आणलं जातंय. सरकारला माझं स्पष्ट सांगणं आहे, तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा. धैर्यशील यांना जेलमध्ये बसू द्या. मी उमेदवार आहे असे समजून संपूर्ण सहाही विधानसभा मतदारसंघात फिरून त्यांना तीन लाखांच्या फरकाने निवडून आणणार, असा इशारा आणि विश्वास उत्तम जानकर यांनी व्यक्त केला आहे.

भाजपकडून राज्यात प्रत्येकालाच भीती दाखवली जात आहे. मलाही म्हणाले तुमचा दाखलाच ठेवणार नाही. न्यायव्यवस्था आमच्या बाजूला आहे. मग तुम्ही कसे आमदार होणार, अशी धमकी दिल्याचे आरोप उत्तम जानकर यांनी केले आहे. मोहिते पाटलांनीही माझ्यावर 27 गुन्हे दाखल केले होते. मात्र मी ही फार काही गुणी बाळ नव्हतो. मात्र उत्तम जानकर आमदार होण्यासाठी लढत नाही तर ही लढाई राज्याच्या अस्तित्वाची आहे. आज जर न्यायव्यवस्था अशी वागत असेल तर हा जानकर बॉम्ब बनून काम केल्याशिवाय राहणार नाही, असंही उत्तम जानकर (Uttam Jankar ) म्हणाले आहेत.

News Title : Uttam Jankar serious allegations against BJP Madha Lok Sabha

महत्त्वाच्या बातम्या – 

“एकनाथ शिंदेंचं काम संपलं, पुढच्या 2 महिन्यात…”, आंबेडकरांचा खळबळजनक दावा

3 अक्षरी उद्योजकामार्फत मला निरोप आला होता!, निलेश लंकेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट

हा झेल नाही पाहिला तर काय पाहिलं?, रवींद्र जडेजानं घेतलेल्या झेलची तुफान चर्चा

“मी सध्या अजित पवार गटात आहे, मात्र अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार”

या राशीच्या व्यक्तींने प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवावे