भाजपसोबत जाऊन अजित पवारांची फरफट, फक्त दोनच जागांवर स्वतःचे उमेदवार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांना केवळ 5 जागा मिळाल्यात. त्यातील 2 जागांवर अजित पवार (Ajit Pawar) यांचे उमेदवार आहेत. तर राज्यातील 3 उमेदवार हे आयात केलेले आहेत. मित्रपक्षांच्या इतर उमेदवारांना संधी देण्यात आली. यामुळे आता अजित पवार (Ajit Pawar) यांची फरफट पाहायला मिळतेय. (Ajit Pawar)

मागील लोकसभा निवडणुकीचा मागोवा घेतला तर 2019 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे विजयी झाल्या. त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे विजयी झाले. साताऱ्यातून श्रीनिवास पाटील विजयी झाले होते. रायगड येथून सुनील तटकरे विजयी झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यातील तीन खासदार हे शरद पवार यांच्यासोबत राहिले. तर सुनील तटकरे हे अजित पवार गटात गेले.

अजित पवार गटाचे दोन हक्काचे उमेदवार

बारामती, रायगड, शिरूर, परभणी आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून दोन उमेदवार हे अजित पवार गटाचे आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर रायगड येथून सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे दोन हक्काचे उमेदवार अजित पवार गटाचे आहेत.

उस्मानाबाद मतदारसंघातून राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली. तर शिवसेना शिंदे गटाचे नेते आढळराव पाटील यांना अजित पवार गटात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.

‘या’ जागांवर सोडलं पाणी

परभणी मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली. मात्र यावेळी रासपचे उमेदवार महादेव जानकर लोकसभेच्या रिंगणात आहेत. तर सातारा येथे अजित पवार यांनी दावा केला. मात्र उदयनराजे यांनी भाजप पक्षासमोर सातारा जागेसाठी हट्ट केला. यामुळे अजित पवार यांनी सातारा जागेवर पाणी सोडलंय. नाशिकमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवर दावा केला. मात्र शिवसेना शिंदे गटाने नाशिकच्या जागेवर हट्ट कायम ठेवला, यामुळे अजित पवार यांनी नाशिक जागेच्या उमेदवारीच्या दाव्यावर काढता पाय घेतला.

News Title – Ajit Pawar Own Only Two Seats Maharashtra Loksabha Election

महत्त्वाच्या बातम्या

आज कोणाचं वर्चस्व राहणार? सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स होणार लढत

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळी सुट्या जाहीर; किती दिवस सुट्या?

“एकनाथ शिंदेंचं काम संपलं, पुढच्या 2 महिन्यात…”, आंबेडकरांचा खळबळजनक दावा

3 अक्षरी उद्योजकामार्फत मला निरोप आला होता!, निलेश लंकेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट

हा झेल नाही पाहिला तर काय पाहिलं?, रवींद्र जडेजानं घेतलेल्या झेलची तुफान चर्चा