उन्हाळ्यात घामाघूम झाल्याने अंगाला दुर्गंधी येतेय?, मग ‘या’ टिप्स वापरुन पाहा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sweat Smell Removing tips | उन्हाळा म्हटलं की घामाच्या धारा वाहतात. उन्हात पाच मिनिटेही गेलं की संपूर्ण कपडे घामाने ओले होऊन जातात. मग, नुसतं स्प्रे मारून काम होत नाही. बॉडी स्प्रे किंवा पर्फ्यूम जरी वापरला तरी त्याचा सुगंध हा काही काळच असतो. बरेच जण महागड्या स्प्रेमध्येच पैसे घालतात.

घामाचा वास आल्यावर आपण ज्यांना कुणाला भेटतो त्यांनाही आपला किळस वाटतो. यामुळे आपलं इंप्रेशन तर खराब होतंच याशिवाय कुणी आपल्या बाजूला जास्त वेळ थांबतही नाही. अशावेळी आपली लाजिरवाणी स्थिती होऊन जाते. कधी-कधी तर कपडे धुवूनही त्यातून घामाचा वास जात नाही.मग, तेच कपडे घातले की त्याचा अजूनच दुर्गंध येतो. आता यावर काय उपाय करावा?,असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर या लेखात दिलं आहे.

‘या’ टिप्स फॉलो करा

बेकिंग सोडा : बेकिंग सोडा कपड्यांमधून दुर्गंधी दूर ठेवेल. ते धुताना तुम्हाला फक्त बेकिंग पावडर घालायची आहे. असे केल्याने कपडे बुरशी आणि दुर्गंधीपासून दूर राहतील. यामुळे कपड्यांत घामाचा वास येणार नाही.

लिंबूचा वापर : तुम्ही कपडे धुताना लिंबूचा वापर करू शकता.एका बादलीमध्ये लिंबू पाणी घालून त्यात कपडे भिजवत ठेवा. यामुळे कपड्यातील वास दूर होईल. किंवा अंघोळीच्या पाण्यातही तुम्ही लिंबूचा रस टाकला तर घामाचा जास्त वास येणार नाही अनाई तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल.

कडूनिंबाच्या पानांचा वापर : परफ्युम, डिओड्रंट या सगळ्याचा सुगंध काही ठराविक काळापुरताच टिकतो. त्यामुळे घामाचा वास घालवण्यासाठी कडूनिंबाची पानं पाण्यात टाकून त्या पाण्यानं आंघोळ केली (Sweat Smell Removing tips ) तर तुम्हाला खूप फायदा होईल.

दही आणि डाळीचं पीठ : तुमच्या शरीराला जर घामाचा वास खूपच जास्त येत असेल तर डाळीच्या पिठाचा वापर करा. दह्यामध्ये डाळीचं पीठ मिसळायचं आणि ते मिश्रण अंगाला लावून रोज थंड पाण्याने आंघोळ करायची.यामुळे घामाचा वास येणार नाही.

गुलाबजल : अंघोळीच्या पाण्यात गुलाबजल टाकून आंघोळ केल्यास तुमच्या घामाचा वास येणार नाही. याने आंघोळीनंतर शरीराला एक मंद सुगंध येत राहतो आणि आपल्याला स्वतःला खूप ताजंतवानं वाटेल.

पुदिन्याच्या पानांचा वापर : पुदिन्याची वाटलेली पानं आंघोळीच्या पाण्यात टाकावीत त्यावर तुरटीसुद्धा फिरवता येईल. या पाण्यानी आंघोळ केल्यानं घामाचा दुर्गंध लगेच दूर होईल.

News Title – Sweat Smell Removing tips

महत्त्वाच्या बातम्या – 

आज कोणाचं वर्चस्व राहणार? सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स होणार लढत

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळी सुट्या जाहीर; किती दिवस सुट्या?

“एकनाथ शिंदेंचं काम संपलं, पुढच्या 2 महिन्यात…”, आंबेडकरांचा खळबळजनक दावा

3 अक्षरी उद्योजकामार्फत मला निरोप आला होता!, निलेश लंकेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट

हा झेल नाही पाहिला तर काय पाहिलं?, रवींद्र जडेजानं घेतलेल्या झेलची तुफान चर्चा