राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसानं घातला धुमाकूळ; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

Unseasonal Rain | सध्या उन्हाळा ऋतू आहे. राज्यातील वातावरण हे बदलत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभर उकाड्याने नको नको केलं होतं. मुंबई, रायगड आणि ठाणे येथे सर्वाधिक उन्हाचे चटके बसत आहेत. तर काही भागात पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे. लातुर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होताना दिसत आहे. यामुळे पिकांचं, फळांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. (Unseasonal Rain)

काही दिवसांपासून लातूर जिल्ह्याला उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्यात. तर आता काही तासांपासून गारांचा पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं समजतंय. तर दुसरीकडे आंबे, द्राक्षे फळांचे नुकसान झालं आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस

लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. कोपेगाव, गंगापूर येथे गारांचा पाऊस पडला. निलंगा तालुक्यातील कासार शिरशी, हासोरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. लातूर ग्रामीण भागातील गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. औसा तालुक्यातील गावात पाऊस सुरू आहे. (Unseasonal Rain)

पिकांचं मोठं नुकसान

वादळी वाऱ्यासह लातूर जिल्ह्यात आणि शहरात पाऊस पडत आहे. त्याचा थेट परिणाम हा शेतकऱ्यांच्या पिकांवर होताना दिसत आहे. आंबे, द्राक्षांच्या बागांचं नुकसान झालंय. लातूरमध्ये काही ठिकाणी केशर आंब्याच्या बागा आहेत. त्यांचं देखील नुकसान झालं. तर ज्वारी पिकांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आलीये. (Unseasonal Rain)

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. बसलेगाव ते गरोळगी या दोन गावांची वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

News Title- Unseasonal Rain In Latur, Akkalkot, Satara Mahabalwshwar And Ratnagiri District

महत्त्वाच्या बातम्या

“2-3 तास लाईट नसणे… मज्जा आहे… इलेक्शन चालू…”, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

गोळीबाराला आठवडा उलटत नाही तोच सलमानला पुन्हा धमकी!

ईडीच्या कारवाईनंतर शिल्पाच्या नवऱ्याने लढवली जबरदस्त शक्कल?, ‘ती’ पोस्ट चर्चेत

मनोज जरांगे पाटलांचा थेट पंकजा मुंडेंना इशारा, म्हणाले…

उन्हाळ्यात घामाघूम झाल्याने अंगाला दुर्गंधी येतेय?, मग ‘या’ टिप्स वापरुन पाहा