“2-3 तास लाईट नसणे… मज्जा आहे… इलेक्शन चालू…”, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gautami Deshpande | मनोरंजन विश्वामध्ये अनेक अभिनेते-अभिनेत्री नेहमी त्यांच्या वक्तव्यासाठी चर्चेत असतात. सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर अनेकजण भाष्य करत आहेत. सध्या देशामध्ये उन्हाची आणि निवडणुकीची लाट आहे. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी पार पडला. त्यानंतर मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडेनं (Gautami Deshpande) ऐन उन्हाळ्यात सुरू असलेल्या लोडशेडिंग आणि राजकीय परिस्थितीवर अप्रत्यक्षरित्या सुनावलं.

उन्हाळ्याचे दिवस आहेत. हवामान अभ्यासक लोकांना उन्हापासून काळजी घेण्यासाठी सांगत आहेत. अनेकजण उन्हापासून आणि गरमीपासून वाचण्यासाठी पंखा, कुलर आणि एसीचा वापर करताना दिसत आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये महावितरण विभागाने लोडशेडिंग केलं आणि आज निवडणूक सुरू झाली, असं म्हणत विजेच्या प्रश्नाचा संदर्भ थेट राजकीय नेत्यांच्या आश्वासनासोबत लावला. (Gautami Deshpande)

काय होती पोस्ट?

सध्या उन्हाळा आहे. यापार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडेनं एक सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. उन्हाळ्यामुळे अनेकांना लोड शेडिंगचा सामना करावा लागत आहे. यावरून गौतमीने संताप व्यक्त केलाय. “उन्हाळ्यात 2-3 तास लाईट नसणे…मज्जा आहे नाही…क्या बात…इलेक्ट्रिसिटी देणारे, इलेक्शन चालू झाले”, असं गौतमीने पोस्टमध्ये म्हणलंय.

gautami deshpande post on load shading 2024041215620

गौतमी देशपांडेच्या पावलावर पाऊल देत अभिनय क्षेत्रात तिनं ठसा उमटवला. ‘माझा होशील ना’, या मालिकेत तिनं अप्रतिम भूमिका साकारली. सारे तुझ्याचसाठी या मालिकेतून गौतमीने पदार्पण केलं आहे. नुकतच गौतमीने लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरूवात केलीये.

News Title – Gautami Deshpande Angry On Load Shading

महत्त्वाच्या बातम्या

भाजपकडून भीती दाखवली जातेय!, अजित पवार गटाच्या नेत्याचे धक्कादायक आरोप

जुन्या जखमा अजून भरलेल्या नाहीत!, पाटलांच्या पोरीच्या वक्तव्याने अजित पवारांच्या पोटात गोळा

बारामतीसाठी अजित पवारांचं सपशेल लोटांगण, फडणवीस सांगतील ती पूर्व दिशा!

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मोदी पुण्यात येणार, तारीख आली समोर

आज कोणाचं वर्चस्व राहणार? सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स होणार लढत