गोळीबाराला आठवडा उलटत नाही तोच सलमानला पुन्हा धमकी!

Salman Khan Firing

Salman Khan | 14 एप्रिलला रविवारी बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार सकाळी पहाटे 5 वाजता करण्यात आला. त्यानंतर लगेचच घटनास्थळी पोलीस तैनात झाले. याप्रकरणाला आठवडा पूर्ण होण्याआधीच पुन्हा एकदा सलमान खानला (Salman Khan) धमकी आली आहे. ही धमकी लॉरेन्स बिश्नोईनं दिली असल्याचं समजतंय. दरम्यान, झालेल्या गोळीबारात लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईचा हात होता, अशी माहिती आता समोर आलीये.

आज एका व्यक्तीने कॅब बुक करून सलमान खानच्या (Salman Khan) गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पाठवली. ही कॅब लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सलमानच्या (Salman Khan) घराबाहेर पाठवली. यानंतर याप्रकरणाचा शोध घेण्यात आला. याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली असून रोहित त्यागी असं अटक केलेल्या तरूणाचं नाव आहे.

काय आहे कॅबचं प्रकरण?

मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर एक कॅब आली. ती कॅब लॉरेन्स बिश्नोईने बुक केल्याची माहिती समोर आली. सलमान खानचे घर ते वांद्रे पोलीस ठाण्यापर्यंत ही कॅब बुक करण्यात आली. याबाबतची माहिती सलमानच्या सेक्युरिटी गार्डने वांद्रे पोलिसांना दिली. त्यानंतर घडलेला प्रकार पोलिसांनी कॅब चालकाकडून माहिती घेऊन तपास केला. या प्रकरणात कॅब बुक करणाऱ्या व्यक्तीला गाझियाबाद येथून अटक करण्यात आली. कॅब बुक करणाऱ्या आरोपीचं नाव हे रोहित त्यागी असून त्याचं वय 20 वर्षे आहे. त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये.

गोळीबारानंतर सलमान पहिल्यांदा एअरपोर्टवर स्पॉट

सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर सलमान खान पहिल्यांदा घराबाहेर दिसला आहे. तो एअरपोर्ट येथे दिसला आहे. त्यावेळी एअरपोर्टवर कडेकोट बंदोबस्त होता.

काही दिवसांआधी गोळीबार झाल्यानंतर काही नेत्यांनी, काही दिग्गजांनी सलमान खानची भेट घेतली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची भेट घेतली. त्यानंतर आम्ही लॉरेन्स बिश्नोईला खतम करू असं एकनाथ शिंदे म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सलमान खानची भेट घेतली होती.

News Title – Salman Khan Received Threat Again From Lawrence Bishnoi

महत्त्वाच्या बातम्या

आज कोणाचं वर्चस्व राहणार? सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स होणार लढत

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळी सुट्या जाहीर; किती दिवस सुट्या?

“एकनाथ शिंदेंचं काम संपलं, पुढच्या 2 महिन्यात…”, आंबेडकरांचा खळबळजनक दावा

3 अक्षरी उद्योजकामार्फत मला निरोप आला होता!, निलेश लंकेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट

हा झेल नाही पाहिला तर काय पाहिलं?, रवींद्र जडेजानं घेतलेल्या झेलची तुफान चर्चा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .