ईडीच्या कारवाईनंतर शिल्पाच्या नवऱ्याने लढवली जबरदस्त शक्कल?, ‘ती’ पोस्ट चर्चेत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raj Kundra | अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. आता शिल्पाच्या मालमत्तेवर इडीने टाच आणली आहे. शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा या दोघांच्या अढचणीत अजूनच वाढ झाली आहे. एवढंच नाही तर यांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली आहे.

ईडीने कुंद्रा कुटुंबियाची संपत्ती जप्त केल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. यावर शिल्पा आणि राज यांनी अधिकृत असं कोणतंच वक्तव्य केलेलं नाही. पण दोघे सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

शिल्पा आणि राज कुंद्राची पोस्ट चर्चेत

सोशल मीडियावर आता शिल्पा आणि तिच्या नवऱ्याची पोस्ट चर्चेत आली आहे. शिल्पा हिने साई बाबा यांचा फोटो पोस्ट करत ‘सरेंडर’ असं लिहिलं होतं. तिने पोस्टमध्ये सरेंडर लिहिल्यामुळे शिल्पा हिला नक्की काय सांगायचं आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

तर राज कुंद्रा याने देखील एक पोस्ट शेअर केली आहे. ‘एक योग्य व्यक्ती होण्याची एक वेळ असते.. आणि आता अती होत आहे असं सांगण्याची वेळ आली आहे…’, अशी पोस्ट राजने केली आहे. याआधी देखील राज (Raj Kundra) याने पोस्ट शेअर केली होती. ‘जेव्हा तुम्हाला अपमानित वाटत असतं, तेव्हा शांत राहायला शिकणं ही वेगळ्या प्रकारची प्रगती आहे…’ दोघेही सोशल मिडियाच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि पती राज कुंद्रा यांना ईडीकडून नोटीस आली आहे. मनी लाॅंड्रिंग प्रकरणात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांना गुंतवणुकीच्या बदल्यात 10% परतावा दर महिन्याला देणार असल्याचं अमिष दाखून मोठा बिटकाॅन घोटाळा केल्याचा आरोप राज कुंद्रावर लावण्यात आला आहे. बिटकॉइन प्रकरणात फायदा करवून घेऊन राज कुंद्रा सध्याच्या घडीला 150 कोटींच्या फायद्यात असल्याचंही ईडीचं म्हणणं आहे.

ईडीकडून जुहूमधील शिल्पा शेट्टी हिच्या नावे असलेला फ्लॅट, पुण्यातील बंगला तसेच इक्विटी शेअर्सही जप्त करण्यात आले आहेत. राज कुंद्रा (Raj Kundra) याने 80 कोटींचा फ्लॅट फक्त 38 कोटीत पत्नी शिल्पा शेट्टी हिला विकल्याची माहिती ईडीने दिली आहे. 2022 मध्ये त्याने जुहुतील फ्लॅटची विक्री केली होती. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी अशा प्रकारची व्यवस्था केली जात असल्याचं ईडीने म्हटलं आहे.

News Title : Raj Kundra post in discussion

महत्त्वाच्या बातम्या-

आज कोणाचं वर्चस्व राहणार? सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स होणार लढत

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळी सुट्या जाहीर; किती दिवस सुट्या?

“एकनाथ शिंदेंचं काम संपलं, पुढच्या 2 महिन्यात…”, आंबेडकरांचा खळबळजनक दावा

3 अक्षरी उद्योजकामार्फत मला निरोप आला होता!, निलेश लंकेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट

हा झेल नाही पाहिला तर काय पाहिलं?, रवींद्र जडेजानं घेतलेल्या झेलची तुफान चर्चा