नगरमध्ये सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांची दादागिरी, लंकेच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ahmednagar Loksabha | राज्यात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलला पार पडला. अहमदनगर दक्षिण मतदारसंघात (Ahmednagar Loksabha) महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आलीये. महायुतीकडून भाजपचे नेते सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आलीये. प्रचार सुरू असतानाच अहमदनगर लोकसभा (Ahmednagar Loksabha) मतदारसंघात एक धक्कादायक प्रकार घडला. सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांनी निलेश लंके यांच्या पाथर्डी तालुक्यातील एका कार्यकर्त्याला मारहाण केली. यामुळे नगर लोकसभेचं वातावरण बिघडलंय. (Ahmednagar Loksabha)

निलेश लंकेंच्या कार्यकर्त्याला मारहाण

2024 च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा (Ahmednagar Loksabha) मतदारसंघातील वातावरण चांगलंच तापलंय. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही उमेदवार एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काही दिवसांआधी सुजय विखे यांनी एका सभेमध्ये तुतारी वाजवण्याचं आवाहन केलं. त्यानंतर नगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांच्या बाजूनं वातावरण फिरलं असल्याच्या चर्चा आहेत. सध्या नगर लोकसभेत निलेश लंके यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचार करत असलेल्या कार्यकर्त्यांना विखे यांच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. सचिन हांडे असं मारहाण केलेल्या कार्यकर्त्याचं नाव असून ते पाथर्डी येथे राहतात.

सचिन हांडे यांच्यावर ब्लेडनं केले वार

18 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता ही घटना घडली आहे. मारहाणीनंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात त्याने फिर्योद दाखल केली. सचिन हांडे रघुहिवरे ग्रामपंचायतीजवळ उभे असताना, ज्ञानदेव कुऱ्हे, गोरख लबडे आणि दोन इसम त्यांच्या जवळ आले. निलेश लंके यांचा प्रचार का करतो? असा प्रश्न केला. सुजय विखे यांचा प्रचार कर अशी धमकी त्यांनी दिली. त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने हांडे यांच्यावर ब्लेडनं वार केले. त्यानंतर हांडे यांच्याकडील 9 हजार रूपये चोरले.

काही दिवसांआधी सुजय विखे यांचा अंगरक्षक गोरव सुधाकर गर्जे याने निलेश लंके यांच्या एका कार्यकर्त्याला जबर मारहाण केली. शहादेव पालवे असं त्या मारहाण केलेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. गौरव गर्जे नामक व्यक्तीने महादेव यांना जबर मारहाण केलीये.

पाथर्डीमध्ये निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यावर दोनदा जबर मारहाण करण्यात आली. याचा निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राग आहे. “सत्ता तुमच्याकडे असून या सत्तेच्या जोरावर आणि तुमच्या पाठबळावर तुमचे कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करत आहेत,” असं निलेश लंके म्हणालेत.

News Title – Ahmednagar Loksabha An Activist of Nilesh Lanke Beaten By Activist Sujay Vikhe

महत्त्वाच्या बातम्या

“एकनाथ शिंदेंचं काम संपलं, पुढच्या 2 महिन्यात…”, आंबेडकरांचा खळबळजनक दावा

3 अक्षरी उद्योजकामार्फत मला निरोप आला होता!, निलेश लंकेंबाबत शरद पवारांचा गौप्यस्फोट

हा झेल नाही पाहिला तर काय पाहिलं?, रवींद्र जडेजानं घेतलेल्या झेलची तुफान चर्चा

“मी सध्या अजित पवार गटात आहे, मात्र अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार”

या राशीच्या व्यक्तींने प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवावे