हवा फिरली?, ‘या’ एका गोष्टीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दिली पहिल्यांदाच मात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rahul Gandhi |  सध्या सोशल मीडियाची मोठी ताकद आहे. 2014 मध्ये भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारास सुरूवात केली होती. तेव्हापासून इतर पक्षांना डिजीटल माध्यमांचं महत्त्व कळालं आहे. आता भाजपला मागे टाकत काही पक्षांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर देशातील असंख्य जनता जोडून घेतली आहे. (Rahul Gandhi)

सोशल मीडियावर कोणाचं वर्चस्व?

निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो हे अनेकांना माहिती असेलच. राजकीय पक्षांच्या सोशल मीडियाला असंख्य जनता जोडली गेलेली आहे. भाजप सोशल मीडियाचा अधिक वापर करत आहे. मात्र भाजपहून आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडियाला अनेक युजर्स जोडले गेलेत. तृणमूल काँग्रेस पक्षाचा सोशल मीडियावरील उपस्थिती कमी आहे. तर नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर आघाडीवर आहेत.

सहा ते 12 एप्रिल यादरम्यान राजकीय नेते आणि नेत्यांच्या युट्यूब चॅनेलला मिळालेल्या दर्शकांची संख्या प्रसिद्ध करण्यात आलीये. तर 31 टक्के राहुल गांधींचे (Rahul Gandhi) युट्यूब चॅनेल पाहत असल्याची माहिती समोर आलीये. नरेंद्र मोदींचे देखील युट्यूब चॅनेल असून राहुल गांधीहून (Rahul Gandhi) अधिक सबस्क्रायबर आहेत. मात्र मोदींचे युट्यूब चॅनेल हे 9 टक्के दर्शक पाहतात. (Rahul Gandhi)

राहुल गांधी मोदींच्या पुढे

युट्यूब चॅनेलचा विचार केला तर आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. 6 एप्रिल ते 12 पर्यंत राहुल गांधी यांचे युट्यूब चॅनेल आघाडीवर होते. त्याला 5 कोटी 80 दर्शक आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आम आदमीचे युट्यूब चॅनेल आहे. त्यांचे दोन कोटी 80 लाख दर्शकांची पसंती लाभलीये. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे युट्यूब चॅनेल असून 2 कोटी 60 लाख लोकांनी पाहिले. चौथ्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युट्यूब चॅनेल असून 1 कोटी 50 लाख पाहणाऱ्यांची संख्या आहे.

भाजपच्या युट्यूब चॅनेलच्या फॉलोअर्समध्ये सातत्याने घट होताना दिसत आहे. आम आदमी पक्षाच्या युट्यूबवर 5.9 लाख फॉलोअर्स जोडले. तृणमूल पक्षाच्या युट्यूबला 28 हजार फॉलोअर्स वाढले. भाजपचे 5.3 लाख  फॉलोअर्स वाढले.

ट्वीटर फॉलोअर्सच्या बाबतीत नरेंद्र मोदीचे राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा अधिक वर्चस्व आहे. जानेवारी ते मार्चच्या काळामध्ये मोदींचे ट्वीटरवरील 26 लाखांनी फॉलोअर्स वाढले. तर राहुल गांधी यांचे पाच लाखांनी फॉलोअर्स वाढलेत. अरविंद केजरीवाल यांचे एक लाख फॉलोअर्स वाढले. तर ममता बॅनर्जी यांचे 52 हजार फॉलोअर्स वाढले आहेत.

News Title – Rahul Gandhi Most Youtube Like Than Narenra Modi

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसानं घातला धुमाकूळ; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

सुनील तटकरेंची डोकेदुखी वाढली, दुसऱ्या सुनील तटकरेंनी भरला उमेदवारी अर्ज

भाजपनं अजित पवारांना लोकल नेता बनवलं, त्यांनी बारामतीत… रोहित पवारांनी सांगितली भाजपची चाल

नगरमध्ये सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांची दादागिरी, लंकेच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण

“2-3 तास लाईट नसणे… मज्जा आहे… इलेक्शन चालू…”, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत