आज शुभमनचे शिलेदार पंजाबचा रथ रोखणार का?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PBKS vs GT l इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या आगामी 37 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. PBKS सध्या पॉइंट टेबलमध्ये 9व्या स्थानावर आहे, तर गुजरात टायटन्स 8व्या स्थानावर आहे. पंजाब किंग्जने चालू मोसमात सात सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आहेत. तर गुजरात टायटन्सने सातपैकी तीन सामने जिंकले आहेत. मात्र आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पंजाब किंग्स Vs गुजरात टायटन्स पिच रिपोर्ट :

पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हा सामना आज सायंकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. त्यापूर्वी अर्धा तास आधी नाणेफेक होणार आहे. हा सामना फारच रोमांचक होणार आहे. कारण या सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल होणार आहे.

महाराजा यादविंदर सिंग स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी सामान्यतः अनुकूल असते. येथे फलंदाजांना फटके मारणे खूप सोपे वाटते. मात्र, डावाच्या सुरुवातीला नव्या चेंडूने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना यश मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देत असतो.

PBKS vs GT l दोन्ही संघांचे संभाव्य शिलेदार :

पंजाब किंग्ज संभाव्य शेलदार :

रिले रोसोव, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरान (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा (डब्ल्यूके), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, हरप्रीत सिंग.

गुजरात टायटन्स संभाव्य शिलेदार :

शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिनव मनोहर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, संदीप वॉरियर, नूर अहमद, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन.

News Title – PBKS vs GT Live Streaming

महत्त्वाच्या बातम्या

आज ईडन गार्डन्सवर कोण राज्य करणार? KKR vs RCB होणार लढत

शेतकरी भाजपवर नाराज!, पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपचं टेन्शन वाढलं!

बारामतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव निश्चित आहे… आशिष शेलार असं नेमकं का बोलले?

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील ‘तो’ गुन्हा अखेर मागे, राजकीय वर्तुळात एकच चर्चा!

“महाराष्ट्राचा महानालायक कोण?, अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे पहिले येतील”