जितेंद्र आव्हाड यांच्यावरील ‘तो’ गुन्हा अखेर मागे, राजकीय वर्तुळात एकच चर्चा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jitendra Awhad l यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी अशा दोन आघाड्या आमने-सामने आहेत.अशातच सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना काही दिवसांपूर्वी मारहाण झाली होती. त्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. या निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांना दिलासा मिळाला आहे.

मारहाणीचा प्रकार गैरसमजातून झाला :

अशातच आता हा गुन्हा रद्द करण्याच्या अर्जामध्ये महेश आहेर यांचे प्रतिज्ञापत्र जोडण्यात आले आहे. यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, हा मारहाणीचा प्रकार गैरसमजातून झाला आहे. त्यामुळे हा गुन्हा मागे घेण्यास हरकत नसल्याचे नमूद केले आहे. ठाण्यात शिंदे यांची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या पक्षामध्ये वितुष्ट असताना हा समेटाचा प्रकार नेमका का व कुणी घडवून आणला, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

आहेर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे अधिकारी असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. मात्र आता त्यांनीच जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी गैरसमजातून तक्रार केल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

Jitendra Awhad l पडद्यामागून राजकीय हालचाली सुरू :

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, फेब्रुवारी 2023 मध्ये ठाणे पालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांनी आमदार आव्हाड यांच्या मुली व जावयाच्या हत्येची सुपारी दिल्यासंदर्भात कथित ऑडिओ क्लिप समोर आली होती. मात्र या क्लिपनंतर पाच ते सहा जणांनी आहेर यांना ठाणे पालिका मुख्यालयासमोरच मारहाण केल्याची घटना घडली होती.

त्यावेळी आहेर यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करताना मारहाण करणाऱ्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेत आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार, नौपाडा पोलिसांनी आव्हाड यांच्यासह त्यांच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल केला होता. तत्पूर्वी जितेंद्र आव्हाड यांनीही एका ऑडिओ क्लिपचा हवाला देत आहेर गुन्हेगारांच्या साथीने आपल्या तसेच कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचत असल्याची तक्रार नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली होती.

मात्र आता आव्हाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यामध्ये असे सांगण्यात आले होते की, या गुन्ह्याचा आणि आपला काहीही संबंध नसल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. या अर्जात आव्हाड यांनी आहेर यांचे चार पानी प्रतिज्ञापत्र देखील जोडले असून यात आहेर यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात आव्हाड यांच्याविरोधातील तक्रार गैरसमजातून केल्याचे म्हटले आहे. एका ऑडिओ क्लिपमधला आवाज हा माझा आहे या गैरसमजातून हा हल्ला झाला होता. मात्र त्यात आव्हाड यांचा काहीही संबंध नसल्याचे मला स्पष्ट झाले आहे असे आहेर म्हणाले आहेत . मात्र आता या घटनाक्रमामागे पडद्यामागून राजकीय हालचाली सुरू असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

News Title – Complaint against Jitendra Awad withdrawn

महत्त्वाच्या बातम्या

“महाराष्ट्राचा महानालायक कोण?, अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे पहिले येतील”

“लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस”, ‘त्या’ खोलीबद्दल ठाकरेंचा गौप्यस्फोट

या राशीच्या व्यक्तींनी दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी

हवा फिरली?, ‘या’ एका गोष्टीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दिली पहिल्यांदाच मात

“भाजपसोबत आल्यापासून आमच्या अदानी-अंबानींसोबतही ओळखी झाल्या”