बारामतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव निश्चित आहे… आशिष शेलार असं नेमकं का बोलले?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ashish Shelar | लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व चित्र विचित्र झालेलं पाहायला मिळत आहे. अशातच आता बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक ट्वीस्ट घडताना दिसत आहेत. अनेकांचं लक्ष हे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सर्वाधिक लक्ष हे बारामती मतदारसंघाकडे लागलंय. शरद पवार यांनी मूळचे पवार आणि बाहेरचे पवार असं वक्तव्य केलं होतं. त्यावर सुनेत्रा पवार भावूक झाल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. नुकत्याच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे यांनी तुतारी वाजवण्याचं आवाहन केलं. त्यांच्या वक्तव्याने अहमदनगर मतदारसंघात निलेश लंके यांच्या बाजूने मतदान होणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील अनावधानाने सुनेत्रा पवार यांचा पराभव होईल, असं वक्तव्य केलं. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लगालाय.

 “सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार”

आशिष शेलार (Ashish Shelar) हे काल पुणे येथे होते. माध्यमांशी बोलत असताना त्यांना बारामतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. बारामती लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होईल? यावर आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव होईल. सुप्रिया सुळे विजयी होतील असं वक्तव्य केलं. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर सारवासारव केली. सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार असल्याचं त्यांनी माफी मागत शब्द मागे घेतला. त्यांच्या विधानाने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

“पवारांनी मन दुखावणारं वक्तव्य केलं”

सुप्रिया सुळे यांचा पराभव होईल. सुनेत्रा पवार विजयी होतील, असं म्हणत अनावधानाने केलेल्या वक्तव्यावर शेलार यांनी सारवासारव केली असल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीमध्ये मोठा बदल होणार आहे. शरद पवार यांनी मन दुखावणारं वक्तव्य करायला नको होतं. शरद पवार यांनी असं वक्तव्य करायला नको होतं, असं आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणालेत.

माध्यमांशी बोलत असताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे एक सत्य लपवायला किती खोटं बोलणार. आधी ते अमित शहा यांच्याशी बोलणं झाल्याचा दावा करत होते. तर त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांना सांगतिलं असल्याचा दावा करत होते, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

News Title – Ashish Shelar Talk About Sunetra pawar Will Lose In Baramati Loksabha Election

महत्त्वाच्या बातम्या

हवा फिरली?, ‘या’ एका गोष्टीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दिली पहिल्यांदाच मात

“भाजपसोबत आल्यापासून आमच्या अदानी-अंबानींसोबतही ओळखी झाल्या”

काँग्रेसचेच चरित्र षडयंत्र रचण्याचे!, काँग्रेसच्या ‘त्या’ आरोपांवर धीरज घाटेंचं सडेतोड उत्तर

राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसानं घातला धुमाकूळ; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

सुनील तटकरेंची डोकेदुखी वाढली, दुसऱ्या सुनील तटकरेंनी भरला उमेदवारी अर्ज