शेतकरी भाजपवर नाराज!, पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपचं टेन्शन वाढलं!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lok Sabha Election 2024 | देशात 19 एप्रिलपासून लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान झालं.

पहिल्या टप्प्यातील लढती या भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशा आहेत. त्यात नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात लढत आहे. तर, चंद्रपूरात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर , गडचिरोलीमध्ये भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे किरसन नामदेव असा सामना रंगणार आहे.

रामटेकची लढत सुद्धा लक्षवेधी ठरणार आहे. काँग्रेस आमदार राजू पारवे यांच्याविरोधात काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे रिंगणात आहेत. दुसरीकडे भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी 18 उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. महायुतीचे सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.

शेतकऱ्यांची नाराजी भाजपवर भारी पडली?

अजून राज्यात फक्त पहिला टप्पा पार पडला आहे. यातच भाजपचं टेंशन वाढलंय. कारण, कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्यावरून शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी मतदानाच्या टक्केवारीत दिसून आल्याची चर्चा आहे. कोणत्या भागात किती मतदान झाले याचा आढावा घेण्याचं काम पक्षाकडून सुरू झालं असून, प्राथमिक माहिती फारशी अनुकूल नसल्याचं चित्र यातून दिसत आहे.

शेतमालाच्या पडलेल्या दराचा मुद्दा काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचारात लावून धरला. त्यातच भाजपाला केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हिताचे निर्णय मतदारांसमोर मांडत न आल्याने ही बाबही मतदानाच्या (Lok Sabha Election 2024 ) टक्केवारीवर प्रभाव पाडणारी ठरली असल्याचं म्हटलं जातंय. आता पक्षाकडून ही उणीव दुसऱ्या टप्प्यात भरून काढण्याची कसरत सुरू आहे.

पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात पक्षासाठी जे चिंतेचे मुद्दे समोर आले त्यांची झळ दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील अन्य पाच मतदारसंघांमध्ये बसू नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती भाजपच्या पक्षसंघटनेत काम करणाऱ्या एका पदाधिकाऱ्याने दिलीये. मात्र पहिल्या टप्प्यात तरी भाजपला शेतकऱ्यांची नाराजी महागात पडली, अशी जोरदार चर्चा आता राजकारणात आहे.

महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये कुठे, कधी मतदान होणार?

दरम्यान, राज्यात 19 एप्रिलरोजी (Lok Sabha Election 2024 ) पहिला टप्पा पार पडला आहे. आता अजून चार टप्पे बाकी आहेत. त्यात खालील मतदार संघांचा समावेश होतो.

पहिला टप्पा : 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा : 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा : 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा : 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा : 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.

News Title : Lok Sabha Election 2024 Impact of farmers resentment on BJP Voting Percentage

महत्त्वाच्या बातम्या-

“लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस”, ‘त्या’ खोलीबद्दल ठाकरेंचा गौप्यस्फोट

या राशीच्या व्यक्तींनी दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी

हवा फिरली?, ‘या’ एका गोष्टीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दिली पहिल्यांदाच मात

“भाजपसोबत आल्यापासून आमच्या अदानी-अंबानींसोबतही ओळखी झाल्या”

काँग्रेसचेच चरित्र षडयंत्र रचण्याचे!, काँग्रेसच्या ‘त्या’ आरोपांवर धीरज घाटेंचं सडेतोड उत्तर