मोठी गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त

Gold-Silver Rate Today | एप्रिल महिन्यात सोन्याने दरवाढीचे अनेक विक्रम तोडले. काल जळगावच्या सराफा बाजारात जीएसटीसह सोन्याच्या किंमतीने 76 हजारांचा टप्पा ओलांडला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याने विक्रमी धाव घेतली आहे. सोने 2,400 डॉलर प्रति औंसपेक्षा अधिक उसळले.

या आठवड्यात सोन्याच्या भावात तब्बल 2140 रुपयांची वाढ झाली. 15 एप्रिल रोजी 600 रुपयांनी सोनं वधारलं. 17 एप्रिलला भाव जैसे थे होता. 18 एप्रिल रोजी सोनं 330 रुपयांनी स्वस्त झालं. तर काल 20 एप्रिल रोजी 100 रुपयांनी किंमती उतरल्या.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 68,210 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्यात खूप नाही पण, काही अंशी नरमाई आली आहे. त्यामुळे ग्राहकांना थोडा तरी दिलासा मिळाला आहे.

चांदीचे भाव कायम

चांदीच्या किंमतीमध्ये जराही घट झाली नाही. 15 एप्रिल रोजी चांदी 500 रुपयांनी वधारली. 16 एप्रिल रोजी त्यात 1000 रुपयांची वाढ झाली. 17 एप्रिल (Gold-Silver Rate Today)  रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 18, 19 आणि 20 एप्रिल रोजी चांदीने दरवाढीला ब्रेक दिला. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,500 रुपये आहे.

‘असा’ असेल कॅरेटचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 73,404 रुपये, 23 कॅरेट 73,110 रुपये, 22 कॅरेट सोने 67,238 रुपये झाले. 18 कॅरेट 55,053 रुपये, 14 कॅरेट सोने 42,941 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय (Gold-Silver Rate Today) बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केले जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title- Gold-Silver Rate Today April 21 

महत्वाच्या बातम्या-

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील ‘तो’ गुन्हा अखेर मागे, राजकीय वर्तुळात एकच चर्चा!

“महाराष्ट्राचा महानालायक कोण?, अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे पहिले येतील”

“लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस”, ‘त्या’ खोलीबद्दल ठाकरेंचा गौप्यस्फोट

या राशीच्या व्यक्तींनी दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी

हवा फिरली?, ‘या’ एका गोष्टीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दिली पहिल्यांदाच मात