तुम्हीही बनावट पनीर खात नाही ना?, ‘असं’ ओळखा असली आहे की नकली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Tips to recognize fake paneer | पनीर लबाबदर, पनीर टिक्का, पनीर भुर्जी असे चटाकेदार पदार्थ रोज आवडीने प्रत्येक घरात खाल्ले जातात. पण तुम्ही प्रोटीन नाही तर जहर पोटात टाकताय. बाजारात प्रोटीनच्या नावावर सिंथेटिक पनीरची सर्रास विक्री केली जात आहे.

अलीकडेच अधिकाऱ्यांनी तब्बल 1300 किलो बनावट पनीर जप्त केलं आहे. तर 2022 मध्ये मुंबई पोलिसांनी दोन फॅक्टरीमधून जवळपास 2000 किलो नकली पनीर जप्त केलं होतं. काही रिपोर्ट्सनुसार हे बनावट पनीर दूध पावडर आणि पाणी मिसळून बनवले जाते, ज्यामध्ये लिंबाचा रस आणि ॲसिटिक ॲसिड मिसळले जाते.

मलईदार आणि चमकदार दिसण्यासाठी त्यात पाम तेल टाकले जाते. आपणही घरी नेहमी पनीर खात असतो. मग आता प्रश्न पडतो की हे बनावट पनीर ओळखायचं कसं?, तर या लेखात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने  (FSSAI) दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ तपासण्यासाठी अनेक चाचण्या आणि उपाय जारी केले आहेत, तरीही तुम्ही दुकानातून खरेदी केलेल्या पनीरची गुणवत्ता घरबसल्याही तपासू शकता. याच्या टिप्स खाली दिल्या आहेत.

बनावट पनीर कसं ओळखाल?

हातांचा वापर : हाथ स्वच्छ धुवून तुम्ही पनीर मॅश करून बघू शकता. भेसळयुक्त पनीर हे स्किम्ड दुधाने बनवले जाते, त्यामुळे ते हाताचा दाब सहन करू शकत नाही आणि दाब दिल्यास त्याचे त्वरित तुकडे होतात.

आयोडीन टिंचर वापरा : पनीर नैसर्गिक आहे की कृत्रिम हे तपासण्यासाठी आयोडीन टिंचर वापरू शकता. एका पातेल्यात पाणी घाला, त्यात पनीर ठेवा आणि उकळी आणा. ते थंड होऊ द्या. नंतर आयोडीन टिंचरचे काही थेंब घाला आणि रंग बदलून निळा होतो का ते पहा. रंग निळा झाला म्हणजे ते पनीर कृत्रिम आहे.

तूर डाळ ( अरहर डाळ) वापरा : एका पातेल्यात अगदी थोड्या पाण्यात पनीर टाकून ते उकळा. ते थंड झाल्यावर त्यात थोडी तूर डाळ पावडर घाला आणि 10 मिनिटे ठेवून द्या. जर पनीरचा रंग हलका लाल झाला तर हे पनीर डिटर्जंट किंवा युरियाने बनवलेले असल्याचे सिद्ध होईल.

चव बघा: तुम्ही पनीर (Tips to recognize fake paneer) खरेदी करण्यापूर्वी नेहमी थोडेसे चाखून बघा. जर पनीर खूप आंबट लागत असेल तर पनीरमध्ये डिटर्जंट किंवा इतर कोणत्याही निकृष्ट उत्पादनाची भेसळ केल्याची शक्यता असते. असली पनीर पेक्षा बनावट पनीर नेहमीच घट्ट असते. बनावट पनीर सहज खाऊ शकत नाही, ते रबरासारखे ताणावे लागते. यातूनही तुम्ही बनावट पनीर आहे की नाही ते ओळखू शकता.

News Title : Tips to recognize fake paneer

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकरी भाजपवर नाराज!, पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपचं टेन्शन वाढलं!

बारामतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव निश्चित आहे… आशिष शेलार असं नेमकं का बोलले?

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील ‘तो’ गुन्हा अखेर मागे, राजकीय वर्तुळात एकच चर्चा!

“महाराष्ट्राचा महानालायक कोण?, अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे पहिले येतील”

“लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस”, ‘त्या’ खोलीबद्दल ठाकरेंचा गौप्यस्फोट