एका मिनिटासाठी 1 कोटी मानधन घेते ‘ही’ अभिनेत्री; आलिया, दीपिकालाही टाकलं मागे

Urvashi Rautela | मनोरंजन विश्वामध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या अभिनयाव्यतिरिक्त इतर कामातूनही कोट्यवधी रूपये कमावतात. मग ते चित्रपटाचे मानधन असो वा इतर आणखी काही. आलिया भट्ट, दीपिका पादुकोण अगदी प्रियंका चोप्रासारख्या आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकत सर्वाधिक मानधन मिळवणारी अभिनेत्री म्हणून उर्वशी रौतेलाचा नंबर लागतो. उर्वशी एका मिनिटासाठी 1 कोटी रूपये घेते.

3 मिनिटांच्या गाण्यासाठी 3 कोटी

एका वृत्तानुसार, अभिनेत्री उर्वशीने (Urvashi Rautela) ‘स्कंद’ चित्रपटात ‘कल्ट मामा’ या गाण्यावर डान्स केला होता. यासाठी उर्वशीने (Urvashi Rautela) तीन मिनिटांच्या गाण्यासाठी 3 कोटींचं मानधन घेतलं होतं. म्हणजेच एका मिनिटांसाठी उर्वशीने 1 कोटी मानधन घेतलं. एका मिनिटांसाठी 1 कोटी रूपये मानधन मिळवणारी भारतातील पहिलीच अभिनेत्री आहे.

उर्वशीची संपत्ती किती?

याआधी उर्वशीने (Urvashi Rautela) ‘वॉल्टेअर वीरैया’मधील गाण्यासाठी दोन कोटी रूपये घेतले होते. दरम्यान उर्वशी ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ पोस्ट केल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या इन्स्टाग्राम हँडेलवर 71 दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिची एकून संपत्ती ही 550 कोटी असल्याचा अंदाज आहे. (Urvashi Rautela)

उर्वशी ही दक्षिणात्य अभिनेत्यासोबत काम करण्यासाठी इच्छूक होती तिची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. उर्वशी दक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. नंदामुरी बालकृष्णा असं अभिनेत्याचं नाव असून ‘एन बी के-109’ असं चित्रपटाचं नाव आहे. उर्वशीने मॅकग्रेगरकडून मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतलंय. त्यावेळी मॅकग्रेगरने एका मुलाखतीमध्ये उर्वशीचं कौतुक केलंय.

एका मुलाखतीमध्ये मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षक मॅकग्रेगर यांनी मी बॉलिवूडमध्ये शाहरूख खाननंतर उर्वशीला ओळखतो. उर्वशी एक तरूण सुपरस्टार आहे. ती एक उत्तम अभिनेत्री असून तिचा फिटनेस हा उत्तम असल्याचं मॅकग्रेगरनं मुलाखतीत बोलताना सांगितलं.

उर्वशीने 2013 मध्ये चित्रपटात पदार्पण केलं होतं. ‘सिंग साब द ग्रेट’ या चित्रपटात तिनं काम केलं होतं. 2014 मध्ये ‘मिस्टर ऐरावता’ या कन्नड सिनेमात काम केलं. 2022 मध्ये ‘द लिजेंड’ या तमिळ चित्रपटात ती झळकली होती.

News Title – Urvashi Rautela Indias Highest Paid Actress

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाह फडणवीसांना म्हणाले; 2 मोठी माणसं बोलत आहेत त्यामुळे तू बाहेर बस!

“लोकसभेच्या नादात राम सातपुतेंची आमदारकीही गेली आणि खासदारकीही गेली”

आज शुभमनचे शिलेदार पंजाबचा रथ रोखणार का?

आज ईडन गार्डन्सवर कोण राज्य करणार? KKR vs RCB होणार लढत

शेतकरी भाजपवर नाराज!, पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपचं टेन्शन वाढलं!