खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘इच्छा नसतानाही…’

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Pawar | काही वर्षांआधी एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा एकदा ते भाजपच्या वाटेवर आहेत. आपली तब्येत व्यवस्थित नसल्याचं सांगत त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास नकार दिला. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिलीये. (Sharad Pawar)

“नाईलाजाने निर्णय घेतला असावा”

“गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये. महाराष्ट्रामध्ये वैयक्तिक हल्ले होत नव्हते. त्यातुलनेत सध्या महाराष्ट्रामध्ये अधिक वैयक्तिक हल्ले होताना दिसत आहेत. अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. अशीच स्थिती एकनाथ खडसे यांची झालीये. नाईलाजाने निर्णय घेतला असावा”, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणालेत.

स्वत: एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगत आहेत. त्यांनी काही दिवसांआधी वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेतली. त्यांनी जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन दिल्लीत लवकरच प्रवेश होणार असल्याचं सांगितलं. (Sharad Pawar)

भाजपमधील काही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी मला पुन्हा घरवापसी करायला सांगितली. तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा भाजपमध्ये आलं पाहिजे. माझी राजकीय परिस्थिती बघितल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही हे त्यांना सांगितलं होतं, असं खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

“माझा निर्णय आहे. मला वाटलं की स्वगृही गेलं पाहिजे. भाजप माझं घर आहे. मला काही ना काही या घरानं दिलं आहे. या घराच्या पायाभरणीपासून आम्ही योगदान दिलं आहे. काही कारणामूळे मी घरातून बाहेर पडलो. पण आता माझी नाराजी दूर झाली आहे,” असं एकनाथ खडसे म्हणालेत.

News Title – Sharad Pawar Talk About Eknath Khadase Will Enter In BJP

महत्त्वाच्य बातम्या

…तर उन्हामुळे होऊ शकतो कॅन्सर; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

‘नवनीत राणांचा पती रवी राणामुळे…’, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

एका मिनिटासाठी 1 कोटी मानधन घेते ‘ही’ अभिनेत्री; आलिया, दीपिकालाही टाकलं मागे

पोलार्ड आणि टीम डेव्हिड यांच्यावर मोठी कारवाई, भरावा लागणार ‘इतका’ दंड

तुम्हीही बनावट पनीर खात नाही ना?, ‘असं’ ओळखा असली आहे की नकली