उष्माघाताची बातमी वाचताना अँकर स्वतःच कोसळली, Video होतोय व्हायरल

Heatwave | महाराष्ट्रात उष्मघाताने नको नको केलं आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होऊ लागली आहे. हवामान अभ्यासक उन्हापासून काळजी घेण्यास सांगत आहेत. भरदुपारी घराबाहेर न पडण्याचं आवाहन ते करत आहेत. तर सकाळी 7 ते 9 वाजता घराबाहेर जाण्यास हरकत नसल्याचं सांगत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्मघाताचा त्रास जाणवू लागला आहे. दरम्यान उष्मघाताची बातमी वाचत असताना डीडी बंगालच्या न्यूज अँकरला भोवळ आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. (Heatwave)

उष्मघाताची बातमी वाचताना न्यूज अँकर कोसळली

मुंबई, रायगड आणि ठाणे येथे राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद आढळली. मुंबईसारख्या ठिकाणी तब्बल 40 हून अधिक तापमान पाहायला मिळत होतं. हे तापमान तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा पाहायला मिळालं. यामुळे अनेकांना उष्मघाताच्या समस्या होताना दिसत आहेत. आता तर डीडी बंगाल वृत्तवाहिनीच्या न्यूज अँकर उष्मघाताची बातमी वाचताना कोसळली आहे. (Heatwave)

राज्यातच नाहीतर देशात उष्मघाताने अहाकार माजला आहे. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. दरम्यान डीडी बांगलाच्या (दूरदर्शन बंगाल) अँकर लोपामुद्रा सिन्हा बातम्या वाचत असताना बेशुद्ध झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. उष्मघाताची (Heatwave) बातमी वाचत असताना त्यांना भोवळ आली. लोपमुद्राचा बेशुद्ध झाल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

लोपमुद्रा यांनी स्वत: शनिवारी फेसबुक लाईव्ह येऊन दूरदर्शनच्या स्टुडिओत नेमकं काय झालं याबाबतची माहिती दिली. “लाईव्ह बातम्या वाचताना ब्लड प्रेशर कमी झालं त्यामुळे मी बेशुद्ध झाले. गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. मी कधीच पाणी घेऊन स्टुडिओत जात नाही. स्टुडिओत गेल्यानंतर पाणी आणून देण्यासाठी मी व्यवस्थापकाला इशारा केला”

“पाणी आणण्यापूर्वीच मी बेशुद्ध झाले. त्यावेळी मी पाणी पिऊ शकले नाही. लोपमुद्रा म्हणाल्या की, माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. चार बातम्या बाकी होत्या. त्या चार बातम्या मी पूर्ण करू शकेल असं मला वाटत होतं. मी दोन बातम्या कशाबशा वाचल्या. त्यातली तिसरी बातमी ही उष्मघातासंबंधीत होती. ती बातमी वाचत असताना हळूहळू भोवळ येऊ लागली. तेवढ्यात मला दिसणं बंद झालं. माझ्या डोळ्यासमोर काळाकुट्ट अंधार झाला,” असं लोपामुद्रा यांनी घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला.

News Title – Heatwave Doordarshan anchor faints during live News Reading

महत्त्वाच्या बातम्या

‘रश्मी ठाकरे फक्त दिसतात भोळ्या त्या…’; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

मोठी बातमी! मुंबईतील भाजपच्या कार्यालयाला भीषण आग

…तर उन्हामुळे होऊ शकतो कॅन्सर; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

‘नवनीत राणांचा पती रवी राणामुळे…’, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

एका मिनिटासाठी 1 कोटी मानधन घेते ‘ही’ अभिनेत्री; आलिया, दीपिकालाही टाकलं मागे