‘छत्रपती शिवरायांची क्षमा मागून…’; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chinmay Mandlekar | मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारे आणि भूमिकेला चपखल बसणारे अभिनेते अमोल कोल्हे आणि चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) आहेत. अमोल कोल्हे यांनी राजा शिवछत्रपती मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये तब्बल सहा मराठी ऐतिहासिक पटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) धक्कादायक निर्णय घेतलाय.

चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हे केवळ राज्यातच नाहीतर परराज्यामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे परिचित आहेत. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे अनेकांनी ओळख दिली आहे. मात्र आता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार नसल्याचं सांगितलं आहे. याचं कारण ऐकूण आपल्याला धक्का बसेल.

चिन्मय मांडलेकर हे मराठी चित्रपपटसृष्टीतील उत्तम लेखक, दिग्दर्शक अभिनेता आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी केवळ महाराष्ट्र राज्य नाहीतर देशामध्ये त्यांचा चाहता वर्ग आहे. मात्र आता आपल्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्याने त्याला आणि त्याच्या पत्नीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणं थांबवणार असल्याचं सांगितलं चिन्मय मांडलेकरने सांगितलं आहे. मुलाच्या जाहांगीर नावाचा संबंध नेटकऱ्यांनी थेट महाराजांच्या भूमिकेशी लावला आहे.

चिन्मय मांडलेकरने व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती

सोशल मीडियावर चिन्मय मांडलेकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका न करण्याचं कारण सांगितलं आहे. मुलाचं नाव जहांगीर आहे. यामुळे अनेक नेटकऱ्यांनी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला ट्रोल केलं. त्याच्या पत्नीलाही ट्रोल करण्यात आलं. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मला शिवरायांच्या भूमिकेमुळे लाखो मुलांचं प्रेम मिळालं. मात्र यामुळे माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. माझ्या मुलाचा जन्म हा 2013 रोजी झाला. तेव्हा नाही कोणी ट्रेल केलं. आता ट्रोल करायला सुरूवात केली. छत्रपती शिवरायांची क्षमा मागून मी भूमिका करण्यापासून रजा घेत असल्याचं त्यांनी व्हिडीओतून सांगितलं.

 

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा चिन्मय मांडलेकरला पाठिंबा

मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि बहिण गौतमी देशपांडे यांनी चिन्मय मांडलेकरच्य व्हिडीओचा फोटो शेअर करत चिन्मय मांडलेकरला पाठिंबा दिलाय. गौतमी देशपांडेनं लिहिलं की, “ट्रोलिंगमुळे किती गोष्टी गमवायच्या? एखाद्याला इतका त्रास द्यावा की, त्याला इतका मोठा त्रासदायक निर्णय घ्यावासा वाटला? हाही विचार करत नाही की त्याचे comments त्याची मुलं देखील वाचत असतील? घरचे बघत असतील? संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत,” असं मृण्मयी देशपांडे म्हणाली.

mrunmayee

News Title – Chinmay Mandlekar Take Big Desicion Of Chhatrapati Shivaji Maharaj

महत्त्वाच्या बातम्या

खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘इच्छा नसतानाही…’

“…म्हणून फडणवीसांचे पंख छाटण्यात आले अन् त्यांना उपमुख्यमंत्री केलं”

‘रश्मी ठाकरे फक्त दिसतात भोळ्या त्या…’; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

मोठी बातमी! मुंबईतील भाजपच्या कार्यालयाला भीषण आग

…तर उन्हामुळे होऊ शकतो कॅन्सर; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा