‘रश्मी ठाकरे फक्त दिसतात भोळ्या त्या…’; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rashmi Thackeray | गेल्या दोन दिवसांपासून आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावरून जोरदार शाब्दिक चकमकी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना मी तयार करतो. आदित्य तयार झाल्यावर त्याला मुख्यमंत्री करतो आणि मी केंद्रात जाऊन अर्थमंत्री होतो, असं म्हटलं होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांच्या या दाव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर जोरदार टीका केली होती.

मी असलं कोणतंच आश्वासन दिलं नव्हतं. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायला वेड लागलं का? उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांनी अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली होती की माझ्याशी हे एकदा ठरवावं, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देत सदा सरवणकर यांनी एक वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

“रश्मी ठाकरे फक्त दिसतात भोळ्या”

सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) दिसतात भोळ्या, पण त्या अतिशय कपटी आहेत, अशी घणाघाती टीका सदा सरवणकर यांनी केली आहे.

सदा सरवणकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात ते रश्मी ठाकरेंवर (Rashmi Thackeray) टीका करताना दिसत आहेत. अतिशय विचित्र व्यक्तीमत्त्व, दिसतंय भोळं पण अतिशय कपटी, असं सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.

“उद्धव ठाकरेंना घरात कोंडू ठेवलं होतं”

मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रीने केलेला हा अट्टाहास. उद्धव ठाकरेंना घरात कोंडू ठेवलं होतं. नवऱ्याला घरात कोंडू ठेवायचं आणि मुलाला पुढे आणायचं. त्यानंतर त्याला मुख्यमंत्री बनवायचं हे त्यामागचं आईचं कारण होतं. मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचा आईचा प्लॅन होता, असं सदा सरवणकर यांनी म्हटलंय.

सदा सरवणकर यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलंय. आता सदा सरवणकरांच्या टीकेला ठाकरे गट काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे.

महत्त्वाच्या बातम्या-  

मोठी बातमी! मुंबईतील भाजपच्या कार्यालयाला भीषण आग

…तर उन्हामुळे होऊ शकतो कॅन्सर; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

‘नवनीत राणांचा पती रवी राणामुळे…’, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

एका मिनिटासाठी 1 कोटी मानधन घेते ‘ही’ अभिनेत्री; आलिया, दीपिकालाही टाकलं मागे

पोलार्ड आणि टीम डेव्हिड यांच्यावर मोठी कारवाई, भरावा लागणार ‘इतका’ दंड