…तर एकनाथ शिंदेना जेलमध्ये टाकायचा प्लॅन; ‘या’ नेत्यानी केला गौप्यस्फोट

Eknath Shinde l सध्या राजकारणात मोठ्या उलाढाली होत आहेत. कारण राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे फिरत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान देखील पार पडलं आहे. अशातच आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्ते देखील जोरात करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळाची विरोधकांवर मोठे आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

Eknath Shinde l मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजप पक्ष तुरुंगात टाकणार होता :

अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मागे भारतीय जनता पक्ष ईडी आणि सीबीआय लावून त्यांना तुरुंगात टाकणार होते असा खळबळजनक गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे तुरुंगात जायचं नाही म्हणून कुठे-कुठे जाऊन रडले, त्यांनाच विचारा, तसेच स्वत: एकनाथ शिंदे तुरूंगाला घाबरून पळाले असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकतर भारतीय जनता पक्षामध्ये फक्त भ्रष्टाचाऱ्यांना स्थान आहे किंवा खोट बोलणाऱ्यांना जागा असल्याचं ते बोलले आहेत. एखादा माणूस भारतीय जनता पक्षामध्ये गेला की, त्याला खोटं बोलण्याचं ट्रेनिंग देखील दिलं जातं असे टीकास्त्र खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ? :

गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एका मुलाखतीत महाविकास आघाडीवर एक आरोप केला होता. त्यामध्ये भाजपच्या दिग्गज मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा डाव होता असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्याच मुद्द्याला धरून खासदार संजय राऊत यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट करत एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षावर आरोप केले आहेत.

गेल्या दोन वर्षांपूर्वी म्हणजेच जून 2022 मध्ये सरकार कोसळण्याआधी महाविकास आघाडीने भाजपाचे देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन या नेत्यांना अटक करण्याच कारस्थान रचलं होतं. याशिवाय भाजपाच्या काही आमदारांना देखील फोडण्याच महाविकास आघाडीच प्लानिंग होतं असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुलाखतीत म्हणाले आहेत.

News Title- BJP party will put Eknath Shinde in jail

महत्त्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्रात काँग्रेसला धक्क्यावर धक्के; आणखी एका नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा आला समोर

‘छत्रपती शिवरायांची क्षमा मागून…’; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

उष्माघाताची बातमी वाचताना अँकर स्वतःच कोसळली, Video होतोय व्हायरल

खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘इच्छा नसतानाही…’